शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा झुकला, बळिराजा जिंकला - प्रकाश वाले | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा झुकला, बळिराजा जिंकला - प्रकाश वाले
'शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा झुकला, बळिराजा जिंकला!'

'शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा झुकला, बळिराजा जिंकला!'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकरी विरोधी तीन जुलमी कृषी कायदे (Agricultural laws) मागे घेण्याची घोषणा केली. हा आंदोलक शेतकऱ्यांचा विजय असून, त्यांचे अभिनंदन करतो. हा बळिराजा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असून शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा मोदी सरकारला झुकावे लागले, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे (Congress) शहराध्यक्ष प्रकाश वाले (Prakash Wale) यांनी केले.

हेही वाचा: सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची CBI च्या संयुक्त संचालकपदी निवड

शेतकरी आणि कॉंग्रेस पक्षाच्या विरोधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी तिन्ही जुलमी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व कॉंग्रेस प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर कॉंग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शेतकऱ्यांचे अभिनंदन करत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

या वेळी बोलताना सोलापूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून शेतकरी दिल्ली बॉर्डरवर व देशभर शेतकरी विरोधी जुलमी कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांना कॉंग्रेस पक्षाने, देश आणि राज्यभरात कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा देऊन शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून तसेच कृषी कायदे मागे घेण्यासाठी दोन कोटी स्वाक्षरी मोहीम कॉंग्रेस पक्षाने घेतली होती. या शेतकऱ्यांच्या आणि कॉंग्रेस पक्षाच्या आंदोलनाला यश येऊन आज केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन जुलमी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा आंदोलक शेतकऱ्यांचा विजय असून, त्यांचे अभिनंदन करतो. हा बळिराजा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असून शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा मोदी सरकारला झुकावे लागले. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता गेल्या दीड वर्षापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या या जिद्दीला सलाम करतो, तसेच या आंदोलनात शेकडो शेतकरी शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत मिळावी, अशी अपेक्षा करतो.

हेही वाचा: ...अन्यथा 'सिद्धेश्‍वर'च्या चिमणी पाडकामाला दोन महिन्यांची मुदत!

यावेळी माजी आमदार निर्मला ठोकळ, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश सचिव अलका राठोड, पश्‍चिम महाराष्ट्र यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक शिवा बाटलीवाला, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, आदींसह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

loading image
go to top