सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची सीबीआयच्या संयुक्त संचालकपदी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्या कुलकर्णी
सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची सीबीआयच्या संयुक्त संचालकपदी निवड

सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची CBI च्या संयुक्त संचालकपदी निवड

सोलापूर : मूळ सोलापूरच्या (Solapur) व सध्या तमिळनाडू (Tamilnadu) येथील आयपीएस अधिकारी विद्या जयंत कुलकर्णी (Vidya Kulkarni) यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) च्या संयुक्त संचालकपदी निवड झाली आहे. विद्या जयंत कुलकर्णी या 1998 च्या बॅचमधील तमिळनाडू केडरच्या आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. त्यांची पुढील पाच वर्षांकरिता केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) च्या संयुक्त संचालकपदी निवड झाली आहे.

हेही वाचा: ...अन्यथा 'सिद्धेश्‍वर'च्या चिमणी पाडकामाला दोन महिन्यांची मुदत!

विद्या कुलकर्णी यांचे मूळ गाव तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) हे आहे तर औरंगाबाद हे सासर आहे. त्यांचे वडील स्टेट बॅंकेत अधिकारी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथे झाले. पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण बार्शी येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूर येथे झाले. सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्युटर सायन्समध्ये त्या बी. ई. आहेत.

आपल्या यशस्वी प्रवासाबद्दल 'सकाळ'शी बोलताना त्या म्हणाल्या की, अभियांत्रिकी पदवीनंतर पुणे विद्यापीठातून सोशल स्टडीज या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर पुण्यामध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी केली. वाचनाची आवड अगदी सुरुवातीपासून होती. तसेच पोलिस गणवेशाची आवड होती. त्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. मग मी पुण्यात अभ्यास केला. माझ्या कुटुंबाने यासाठी मला पूर्ण सहकार्य केले, यामुळे मी माझे ध्येय गाठू शकले.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

आयपीएस झाल्यानंतर तमिळनाडू केडरमध्ये विद्या कुलकर्णी यांनी विविध पदांवर काम केले. सध्या त्या तमिळनाडूच्या पोलिस महानिरीक्षक आहेत. यापूर्वी त्यांनी 2009 ते 2014 या कालवधीत पुणे सीबीआयसाठीही काम पाहिले आहे.

loading image
go to top