जप्त वाहनांची 1 जूननंतरच सुटका ! वाहतूक पोलिसांनी सुरू केली कारवाई

जप्त वाहनांची 1 जूननंतरच सुटका ! वाहतूक पोलिसांनी सुरू केली कारवाई
Updated on
Summary

संचारबंदीच्या काळात दुचाकीवरून डबल- ट्रीपल सिट प्रवास करण्यावर निर्बंध आहेत. तर तीन- चारचाकी वाहनात एकूण क्षमतेच्या 50 टक्‍केच प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे.

सोलापूर : कडक संचारबंदीतही नागरिकांना आता सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा माल खरेदी करता येणार आहे. मात्र, या वेळेत कोरोनासंबधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई (Action) केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकाकडील वाहन जप्त केले जाणार आहे. त्या वाहनाची (vehicles) सुटका 1 जूननंतरच केली जाणार आहे, तसे आदेश पोलिस उपायुक्‍त डॉ. दिपाली धाटे यांनी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना दिले आहेत. (The confiscated vehicles will be released only after June 1)

जप्त वाहनांची 1 जूननंतरच सुटका ! वाहतूक पोलिसांनी सुरू केली कारवाई
आंतरजिल्हा, आंतरराज्य रस्ते मे अखेर बंदच !

संचारबंदीच्या काळात दुचाकीवरून डबल- ट्रीपल सिट प्रवास करण्यावर निर्बंध आहेत. तर तीन- चारचाकी वाहनात एकूण क्षमतेच्या 50 टक्‍केच प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी नियम पाळणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाला दंड करून त्याच्याकडील वाहन जप्त केले जाणार आहे. दुचाकीवर दोघांनी प्रवास केल्यास पाचशे तर तिघांनी प्रवास केल्यास साडेसातशे रूपयांचा दंड आकारला जात आहे.

तीनचाकी वाहनात तीनपेक्षा अधिक तर चारचाकी वाहनातून तीन अथवा चारपेक्षा अधिक प्रवासी असल्यास प्रत्येक प्रवाशांसाठी पाचशे रूपयांचा दंड आकारला जात आहे. या नियमांचे पालन करणे प्रत्येक वाहनचालकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. नियम मोडणाऱ्यांचे वाहन जप्त केले जाणार असून, त्याची सुटका लॉकडाउन संपल्यावरच केली जाणार आहे, असे डॉ. धाटे म्हणाल्या. शहरात सात पोलिस ठाण्याअंतर्गत ही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(The confiscated vehicles will be released only after June 1)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com