esakal | आज आढळली कोरानाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वांत कमी रुग्णसंख्या
sakal

बोलून बातमी शोधा

Corona active

दहा हजारांच्या आत जिल्ह्यातील ऍक्‍टिव्ह रुग्ण ! एक लाख 36 हजार 769 रुग्ण कोरोनामुक्‍त; नव्याने वाढले 843 रुग्ण

आज आढळली कोरानाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वांत कमी रुग्णसंख्या !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corana's second wave) पहिल्यांदाच ऍक्‍टिव्ह रूग्णसंख्या (उपचार घेणारे रूग्ण) दहा हजाराच्या आत आली आहे. सद्य:स्थितीत शहरातील 575 तर ग्रामीणमधील आठ हजार 318 रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. आज ग्रामीणमध्ये नव्याने 843 तर शहरात 30 रूग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ग्रामीणमधील दोन हजार 25 तर शहरातील 43 रूग्ण कोरोनामुक्‍त (Covid-19) झाले आहेत. दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रूग्णसंख्या आत शहरात आढळली. ग्रामीणमधील 22, शहरातील तिघांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता कायम आहे. (The Corana's second wave found the lowest number of patients today)

हेही वाचा: लवंगीतील गतिमंद बालगृहातील 41 मुले कोरोना पोझिटिव्ह !

आतापर्यंत शहर-जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या एक लाख 49 हजार 565 झाली असून त्यातील तीन हजार 904 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर एक लाख 36 हजार 768 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 24, मंगळवेढ्यात 35 रूग्ण वाढले आहेत. तर बार्शीत 140, माढ्यात 177, माळशिरसमध्ये 191 रूग्ण वाढले असून या तालुक्‍यात प्रत्येकी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच करमाळ्यात 41 रूग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापुरात 12 तर दक्षिण सोलापुरात 26 रूग्ण वाढले असून दोन्ही तालुक्‍यात प्रत्येकी तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मोहोळ तालुक्‍यात 40 रूग्ण वाढले असून चौघांचा तर पंढरपूर तालुक्‍यात 100 रूग्ण वाढले असून पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण सोलापुरातील बाळगी येथील 36 वर्षीय तरूणाची पाच दिवसांची झुंज अपयशी ठरली असून त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नियमांचे उल्लंघन करीत आजार अंगावर काढल्याने आणि हॉस्पिटलमध्ये वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने अनेकांचा बळी गेला आहे.

हेही वाचा: चंद्रभागा नदीत एका महिलेसह मुलगा गेला वाहून !

शहरातील 11 प्रभागात रुग्णच नाही

शहरातील कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. आज एक हजार 975 संशयितांमध्ये 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये सर्वाधिक सात तर प्रभाग क्रमांक सहामध्ये पाच रूग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील एक, चार, आठ, 11, 12, 14, 15, 17, 20 ते 22 या प्रभागांमध्ये एकही रूग्ण सापडलेला नाही. महापालिका प्रशासनाच्या उपाययोजना, पोलिस प्रशासनाची साथ आणि नागरिकांचे सहकार्य यातून कोरोना नियंत्रणात येऊ लागल्याचे चित्र आहे.

loading image
go to top