राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्या! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सूर
राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्या! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सूरesakal

राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्या! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सूर

राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्या! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सूर
Summary

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर या भागातील जनतेचे प्रेम गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. मात्र गटबाजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. आता तरी सर्वांनी एकत्र येऊन गटबाजीला तिलांजली द्यावी, हेच खऱ्या अर्थाने खासदार शरद पवार यांना वाढदिवसाची भेट असेल, अशा भावना राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल्या. (The district leaders expressed their displeasure over the factionalism in the NCP)

राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्या! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सूर
उद्या लस घ्यावीच लागेल! निर्बंधामुळे तीन लाख जणांनी घेतला पहिला डोस

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर (Pandharpur) येथे राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभागाचे (Nationalist Congress Industry and Trade Department) प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे (Nagnath Faate) यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांनी खासदार शरद पवार यांच्या कार्याचा गौरव करत जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणखी भक्कम करण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे (Baliram Sathe), प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील (Deepak Salunkhe-Patil), व्यापार उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे (Kalyanrao Kale), जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी, डॉ. प्रणिती भालके (Dr. Praniti Bhalke), राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, शहराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, युवक शहराध्यक्ष स्वप्नील जगताप, अतुल खरात, सी. पी. बागल, संतोष नेहतराव, श्रेया भोसले, महिला तालुकाध्यक्षा राजश्री ताड, शहराध्यक्षा संगीता माने, अनिता पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्या! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सूर
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण अंगलट!

यावेळी बळिराम साठे म्हणाले, आज पक्षात प्रत्येकालाच पद पाहिजे. त्याशिवाय काम करण्याची त्यांची तयारी दिसत नाही. आपल्यातील मतभेदामुळेच पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. येणाऱ्या निवडणुकीत सर्वांनी मिळून विजय खेचून आणूयात. कल्याणराव काळे म्हणाले, प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. त्यांचे विचार घेऊन प्रत्येकाने पुढे गेले पाहिजे. येणाऱ्या काळात सर्वांनी मिळून पक्षाला योगदान देण्याची गरज आहे. राष्ट्रवादी व्यापार उद्योग विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी कार्यक्रमामागची भूमिका विशद करून शरद पवारांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com