esakal | जिल्ह्याला अजून हवेत 57 लाख डोस! 24.75 लाख व्यक्‍ती वेटिंगवरच
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine

सोलापूर ग्रामीण व शहरातील 24 लाख 75 हजार 459 नागरिकांना अजूनपर्यंत लस मिळालेली नाही. शिवाय सहा लाख 83 हजार 489 व्यक्‍तींना दुसरा डोस टोचायचा बाकी आहे.

जिल्ह्याला अजून हवेत 57 लाख डोस! 24.75 लाख व्यक्‍ती वेटिंगवरच

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर (Solapur) ग्रामीण व शहरातील 24 लाख 75 हजार 459 नागरिकांना अजूनपर्यंत लस (Covid-19 Vaccine) (Covid-19) मिळालेली नाही. शिवाय सहा लाख 83 हजार 489 व्यक्‍तींना दुसरा डोस टोचायचा बाकी आहे. जिल्ह्यासाठी आणखी 56 लाख 34 हजार 407 डोसची गरज आहे. जिल्ह्यातील 11 तालुके आणि महापालिका क्षेत्रात 18 वर्षांवरील तब्बल 35 लाख 78 हजार 32 व्यक्‍ती आहेत. त्या सर्वांना लस टोचण्याचे (Caccination0 उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत 11 लाख दोन हजार 573 व्यक्‍तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी केवळ चार लाख 19 हजार 84 जणांनाच दुसरा डोस मिळाला आहे. त्यामध्ये पहिला डोस घेतल्यानंतरचा कालावधी पूर्ण झालेला नाही.

हेही वाचा: कोरोनामुळे 28 हजार मुले अनाथ! शासन मदत नाहीच; अनाथ बनले बालमजूर

जिल्ह्यासाठी जानेवारीपासून 3 सप्टेंबरपर्यंत 15 लाख 29 हजार 51 डोस मिळाले आहेत. त्यात 14 लाख 53 हजार 946 कोविशिल्ड लसीचे डोस तर 75 हजार 105 कोवॅक्‍सिन लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत को-मॉर्बिड व 60 वर्षांवरील व्यक्‍तींनाच प्राधान्य देण्यात आले असून 18 वर्षांवरील बहुसंख्य तरुण लसीकरणापासून दूरच आहेत. जिल्हा परिषद, महापालिकेतील पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने पाठवून लसीचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली. आता मागील काही दिवसांपासून 40 हजारापेक्षा अधिक लस एकाचवेळी मिळू लागली आहे. मागील आठ महिन्यांपासून लसीकरण सुरू असून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, शिक्षक, को-मॉर्बिड, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 18 वर्षांवरील तरुणांना लस टोचली जात आहे.

हेही वाचा: आंतरजिल्हा बदलीसाठी 11 हजार शिक्षक इच्छुक! दिवाळीनंतर बदल्या

महिनानिहाय लसीकरण

 • जानेवारी : 10,145

 • फेब्रुवारी : 37,009

 • मार्च : 1,37,305

 • एप्रिल : 1,73,784

 • मे : 2,25,471

 • जून : 1,42,082

 • जुलै : 2,69,481

 • ऑगस्ट : 4,18,901

 • सप्टेंबर : 1,98,512

लसीकरणासंदर्भात ठळक बाबी...

 • कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी घ्यावा दुसरा डोस

 • कोवॅक्‍सिन लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनी टोचला जातो

 • स्फुटनिक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दिला जातो दुसरा डोस

 • प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एकाही रुग्णाचा कोरोनामुळे झाला नाही मृत्यू

क्षेत्रनिहाय लसीकरण...

(शहर)

 • पहिला डोस : 3,19,516

 • दुसरा डोस : 1,29,189

(ग्रामीण)

 • पहिला डोस : 7,16,862

 • दुसरा डोस : 2,74,452

loading image
go to top