कार्यक्रम पुण्यतिथीचा चर्चा 'विठ्ठल'च्या निवडणुकीची

कार्यक्रम पुण्यतिथीचा चर्चा 'विठ्ठल'च्या निवडणुकीची
Summary

कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभा केला जाईल, असे कै. पाटील यांचे नातू व श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी जाहीर केले.

पंढरपूर (सोलापूर) : माजी आमदार तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे (shri vitthal sahakari sugar factory) संस्थापक (कै.) औदुंबर आण्णा पाटील (audumbar anna pati) यांनी उभ्या केलेल्या श्री विठ्ठल कारखान्यास गतवैभव प्राप्त करण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे. कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभा केला जाईल, असे कै. पाटील यांचे नातू व श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी जाहीर केले. (the founder of shri vitthal sahakari sugar factory karmaveer late. he was greeted on the occasion of audumbar patil death anniversary)

कार्यक्रम पुण्यतिथीचा चर्चा 'विठ्ठल'च्या निवडणुकीची
शिर्डी संस्थान ‘राष्ट्रवादी’कडे, पंढरपूर काँग्रेसला?

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मवीर कै. औदुंबर (आण्णा) पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्ताने येथील श्री विठ्ठल हॉस्पिटलमधील कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील ट्रस्टच्या कार्यालयात आयुर्वेदिक कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम पुण्यतिथीचा चर्चा 'विठ्ठल'च्या निवडणुकीची
पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी करणार प्रयत्न

यावेळी गणेश पाटील म्हणाले की, कै. औदुंबरआण्णा व कै. यशवंतभाऊ यांनी आदर्श असा श्री विठ्ठल साखर कारखाना उभा केला. परंतु, चुकीच्या नियोजनामुळे कारखाना अधोगतीस गेला. त्या परिस्थितीत बदल करण्यासाठी व सभासदांचे हितासाठी युवराज पाटील यांच्या बरोबरीने योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. प्रा. आप्पासाहेब शेट्टी पाटील यांनी श्री विठ्ठल सह साखर कारखान्याची झालेली अधोगती थांबवायची असेल तर परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही व त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष व त्याग करायचे आवाहन उपस्थितांना केले.

कार्यक्रम पुण्यतिथीचा चर्चा 'विठ्ठल'च्या निवडणुकीची
पंढरपूर मंदिर परिसरातील पूजेचं साहित्य विक्रेते भाविकांच्या प्रतिक्षेत!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी कारखान्याच्या थकलेल्या एफआरपी व कामगारांच्या पगाराचा उल्लेख करून संस्था रसातळाला गेली आहे, असे नमूद केले आणि जो लढा उभा करायचा आहे, त्यामध्ये युवराज पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक संस्थेचे माजी अध्यक्ष ऍड. भारत भोसले यांनी केले. यशवंतराव चव्हाण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहाजी साळुंखे यांचा युवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम पुण्यतिथीचा चर्चा 'विठ्ठल'च्या निवडणुकीची
आशादायक ! पंढरपूर तालुक्‍यातील 11 गावे झाली कोरोनामुक्त

कार्यक्रमास जेष्ठ सभासद हरिदादा घाडगे, प्रकाश पाटील, शिवाजी थिटे, संजय भिंगे, विठ्ठल घोडके , भारत शितोळे, विठ्ठल कारखान्याचे संचालक दिनकर पाटील, नारायण जाधव, माजी संचालक दिलीप रणदिवे, संस्थेचे संचालक ऍड, अनंत पाटील, रणजित पाटील, श्री सदगुरू कारखान्याचे संचालक मोहन बागल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल जगताप, युवक कार्याध्यक्ष विशाल सावंत, सुनील जाधव, समीर मोरे, श्री विठ्ठल हॉस्पिटलचे डॉक्‍टर, कर्मचारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी संस्थेचे खजिनदार प्रविण भोसले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com