आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ‘आरोग्या’ची चिंता! स्मरणपत्रानंतरही निधी नाही; जिल्हा रुग्णालयाचे काम बंद

निधी मिळत नसल्याने स्मरणपत्र पाठवले. आमदार सचिन कल्याणशेट्टी व आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निधी तत्काळ मिळेल, अशी ग्वाही मिळाली. परंतु, तो निधी अजूनही न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयाचे काम थांबलेलेच आहे.
Minister Tanaji Sawant
Minister Tanaji Sawantsakal

सोलापूर : गावगाड्यातील सर्वसामान्यांना आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचा आधार आहे. परंतु, बहुतेक ठिकाणी डॉक्टर्सच नाहीत. आरोग्य सेविका, सेवकांसह परिचराची पदे देखील ३९ टक्के रिक्त आहेत. दुसरीकडे मागील ४ वर्षात जिल्हा रुग्णालयाचे काम देखील पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे हातावरील पोट असलेल्या रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाखांवर असून त्यातील ३३ लाख लोक ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किमान एक ‘एमबीबीएस’ डॉक्टर असावा, असा नियम आहे. परंतु, सद्यःस्थितीत तालुक्यांचे बरेच वैद्यकीय अधिकारी ‘बीएएमएस’ पात्रताधारक भरले आहेत. दुसरीकडे हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा ग्रामीणमधील नागरी भागांसाठी सुरु करण्यात आला.

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्वसामान्यांसाठी त्याठिकाणी उपचार मिळावेत हा त्यामागील हेतू आहे. त्याठिकाणी एक डॉक्टर, एक सर्व्हे करणारा (एमपीडब्ल्यू), एक लॅब टेक्निशियन व स्टाफ नर्स असे मनुष्यबळ अपेक्षित आहे. पण, अजूनही सर्व ठिकाणी ते दवाखाने सुरु झालेले नाहीत.

आरोग्य केंद्रे-उपकेंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांची स्वच्छता करायला परिचर नाहीत. आरोग्य सेविका, सेवकांची पदे रिक्त असून ‘एमबीबीएस’ डॉक्टर देखील त्याठिकाणी मिळालेले नाहीत, अशी अवस्था आहे. ग्रामीणमधील सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आरोग्यमंत्री डॉ. सावंत हे रिक्तपदे तत्काळ भरली जातील यादृष्टीने प्रयत्न करतील का, रखडलेले जिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण व्हायला निधी वेळेत देतील का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्मरणपत्र देऊनही ५ कोटीत अडकले जिल्हा रुग्णालय

गुरुनानक चौकात प्रशस्त अशा जागेत १०० खाटांचे महिला-बालरुग्णालय व १०० खाटांचे जिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. इमारतीअंतर्गत फर्निचर व फिटिंगची कामे राहिलेली आहेत. त्यासाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून शासनाला यापूर्वी त्यासंबंधीचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे. तरीही निधी मिळत नसल्याने पुन्हा स्मरणपत्र पाठवले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी व आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निधी तत्काळ मिळेल, अशी ग्वाही मिळाली. परंतु, तो निधी अजूनही न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयाचे काम थांबलेलेच आहे.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची स्थिती

  • प्राथमिक आरोग्य केंद्रे

  • ७७

  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे

  • ४३१

  • उपजिल्हा रुग्णालये

  • ग्रामीण रुग्णालये

  • १४

  • आपला दवाखाना

  • ११

ग्रामीण आरोग्य यंत्रणेत ३९ टक्के पदे रिक्त

ग्रामीण भागातील हातावरील पोट असलेल्या सर्वसामान्यांना खासगी दवाखान्यातील उपचाराचा खर्च परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचा त्यांना मोठा आधार आहे. पण, सद्य:स्थितीत आरोग्य विभागातील ३९ टक्के पदे रिक्त विशेषतः: डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने त्याठिकाणी ‘दवाखाने आहेत पण उपचार मिळत नाही’ अशी दुरवस्था पाहायला मिळत आहे. मागील तीन वर्षांपासून ही स्थिती असून आता सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र डॉ.तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री असल्याने त्यांच्या माध्यमातून पदभरतीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी सर्वांनाच आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com