सोने खरेदी करताहात तर सावधान ! इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटने लावले "हे' नवीन निर्बंध

सोने खरेदी करण्यावर इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटने नवे निर्बंध घातले आहेत
Gold
GoldEsakal

सोलापूर : एका निश्‍चित मर्यादेनंतर अधिक सोने (Gold) खरेदी करता येणार नाही. त्यासाठीच्या नव्या नियमावली इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटने (Income Tax Department) नुकत्याच जाहीर केल्या आहेत. या नियमानुसार विवाहित महिला 500 ग्रॅमपेक्षा अधिक सोने जवळ बाळगू शकणार नाहीत. शिवाय अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि पुरुषांना 100 ग्रॅम सोने कोणताही उत्पन्नाचा पुरावा न देता घरी ठेवता येईल. परंतु या मर्यादेनंतर जर अधिकचे सोने आपल्या घरी आढळून आल्यास तुमच्यावर निश्‍चित कारवाई होऊ शकते. शिवाय मर्यादेनंतर सोने जर खरेदी केले तर त्याबाबत तुमच्याकडे इन्व्हॉईस नसेल तर तुमची चौकशी होऊ शकते, असे कडक निर्बंध इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटने जाहीर केले आहेत. (The Income Tax Department has imposed new restrictions on gold purchases)

सध्या आर्थिक क्रयशक्ती भरपूर असणाऱ्या धनदांडग्यांकडे सोने घालण्याची क्रेझ वाढत जात आहे. ते सोने वाममार्गाने आलेल्या पैशातून खरेदी केले आहे का? शिवाय इन्कम टॅक्‍स चुकवून काही उत्पन्न वेगळे दाखवले आहे का? याची खात्री करून घेण्यासाठी इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटने हे नवे नियम अमलात आणले आहेत. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या जवळ किती सोने आहे, हे घोषित करणे बंधनकारक आहे.

Gold
नववधूप्रमाणे येती-जातीचा कार्यक्रम करणाऱ्या पालकमंत्र्यांना हटवणार का?

सोने किती आणी कोणी खरेदी करावे, यावर बंधन नाही; परंतु खरेदी केलेल्या सोन्याची किंमत मात्र चेकने अथवा ई- पेमेंटने करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Gold
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमुळे मिळाला अक्कलकोटच्या आठवणींना उजाळा !

तुमचे वार्षिक उत्पन्न 50 लाखांच्या वर असेल तर तुम्हाला तुमच्या सगळ्या मालमत्तेची माहिती आयकर विभागाला देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये सोन्याचा देखील समावेश होतो. जवळ असलेले फक्त सोने वेगळं घोषित करण्याची गरज नाही.

- ऍड. दीपक केसकर

इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटने जाहीर केलेल्या नियमावलीबाहेर जर सोने खरेदी करायचे असेल तर त्यासाठी उत्पन्नाचा पुरावा सरकारला द्यावा लागतो. शिवाय घरी लग्नकार्य असेल तरच चौकशी करणारा अधिकारी तुम्हाला सोने खरेदीच्या मर्यादेवर सूट देऊ शकतो.

- निलाशा नोगजा, अध्यक्ष, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com