सोलापूरकरांची जिवनवाहिनी ‘हुतात्मा’! दरवर्षी 10 लाख प्रवाशांचा प्रवास; सोलापूर- पुणे मार्गावर सलग 24 वर्षे सेवा; पूर्वी 12 आता 16 डबे, दररोज सकाळी 6.30 ची वेळ

हुतात्मा एक्स्प्रेसने सोलापूर- पुणे मार्गावर मागील सहा महिन्यांत सुमारे पाच लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांची दर महिन्याला सरासरी अशीच संख्या असल्याने दरवर्षी साधारण दहा लाख प्रवासी हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करतात. या गाडीला मंगळवारी (ता. १५) २४ वर्षे पूर्ण होत असून यंदाचे वर्ष हे या गाडीसाठी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
Solapur passengers stranded at Pune station after Mumbai railway block causes disruptions to express train services."
Solapur passengers stranded at Pune station after Mumbai railway block causes disruptions to express train services."Sakal
Updated on

सोलापूर : हुतात्मा एक्स्प्रेसने सोलापूर- पुणे मार्गावर मागील सहा महिन्यांत सुमारे पाच लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांची दर महिन्याला सरासरी अशीच संख्या असल्याने दरवर्षी साधारण दहा लाख प्रवासी हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करतात. या गाडीला मंगळवारी (ता. १५) २४ वर्षे पूर्ण होत असून यंदाचे वर्ष हे या गाडीसाठी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

सोलापूर - पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही सोलापूरकरांची अत्यंत आवडती व प्रसिद्ध गाडी आहे. या गाडीची पहिली फेरी १५ जुलै २००१ रोजी सोलापूर येथून सकाळी ६ वाजता पुण्याकडे रवाना झाली होती. २४ वर्षांपासून ही गाडी सुरू आहे. मागील सहा महिन्याचा या गाडीच्या प्रतिसादाचा आढावा घेतला असता. या गाडीचे बुकिंग १०३ टक्के होत असते. १ जानेवारी ते ३१ जून या कालावधीत या गाडीने एकेरी फेरीकरता दोन लाख १२ हजार ६३७ जणांनी आरक्षित प्रवास केला आहे. तर जनरल डब्यातून दररोज सुमारे २०० प्रवाशांनी प्रवास केला आहे. सहा महिन्याची प्रवासी संख्या सुमारे चार लाख ६१ हजार ४७४ इतकी होऊ शकते. मागील सहा महिन्यांत या गाडीने सोलापूर विभागाला चार कोटी आठ लाख पाच हजार ५९ रुपये इतका महसूल मिळवून दिला आहे.

पूर्वी १२ आता १६ डबे...

हुतात्मा एक्स्प्रेस सुरू झाली त्यावेळी या गाडीस १२ प्रवासी डबे होते. कालांतराने प्रवासी मागणीनुसार डब्यांच्या संख्येत वाढ होऊन सध्या या गाडीला १६ डबे आहेत. प्रवाशांच्या व रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने या गाडीच्या वेळेत बदल झाले. सुरवातीला सकाळी ०६ :०० त्यानंतर ०६:२०, ०६:५५ व आता ०६:३० या वेळेप्रमाणे हुतात्मा एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल झाले आहेत. विद्युतीकरण व दुहेरी रेल्वे मार्ग तसेच अद्ययावत सुविधा असलेले एल एच बी कोच यामुळे प्रवासाच्या गतीमध्ये वाढ झाल्याने ही रेल्वे लोकप्रिय ठरत आहे.

२००९ पासून वर्धापनदिन

सोलापूर-पुणे (१२१५८) हुतात्मा एक्सप्रेस या रेल्वेगाडीचा प्रथम वर्धापनदिन १५ जुलै २००९ रोजी तत्कालीन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांचे प्रेरणेने सोलापूर रेल्वे स्टेशनवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व तेव्हापासून हुतात्मा एक्स्प्रेसचा वर्धापन दिन प्रवासी सेवा संघाकडून प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

प्रवाशांना गाडीचा मोठा लाभ

सोलापूरमधील कुशल व उच्चशिक्षित तरुणांना रोजगारांसाठी पुणे येथील आयटी उद्योग क्षेत्र सहज उपलब्ध करून देण्यात हुतात्मा एक्स्प्रेसचा मोठा वाटा आहे. अनेक वर्षे साप्ताहिक ये- जा करणाऱ्या अनेक प्रवाशांना या गाडीचा फायदा झाला आहे.

- योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर विभाग सोलापूर

--------------------------------------------------------------------------------

माढा, जेऊर थांब्याची मागणणी रेंगाळलेलीच

सोलापूर -पुणे हुतात्मा एक्सप्रेसला ग्रामीण विभागातील प्रवाशांकरिता माढा व जेऊर रेल्वे स्थानकावर प्रवासी थांबा मंजूर करण्यासाठी प्रवासी सेवा संघ प्रयत्नशील आहे. याकरिता लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्ड नवी दिल्ली येथे पाठपुरावा करावा. माढा व जेऊर येथील थांब्याची मागणी अनेक दिवसांपासून रेंगाळली आहे.

-संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ सोलापूर

आकडे बोलतात....

  • १ जानेवारी ते ३१ जूनचा प्रतिसाद

  • सहा महिन्यांतील फेऱ्या : १८१

  • सहा महिन्यांतील प्रवासी : दोन लाख १२ हजार ६३७

  • सहा महिन्यांतील उत्पन्न : चार कोटी आठ लाख ५०५९

  • प्रवासी बुकिंगची टक्केवारी : १०३.५९ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com