esakal | माढा तालुक्यात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

माढा येथे बंद पाळण्यात आला.

माढा येथे बंद पाळण्यात आला.

माढा तालुक्यात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

माढा (सोलापूर): माढा तालुक्यात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून टेंभुर्णी, कुर्डूवाडी, मोडनिंब, माढा येथे बंद पाळण्यात आला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बंद पुकारला होता. माढा शहरामध्ये सकाळी दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये या हिंसाचारात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून तहसील कार्यालयाच्या प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे झुंजार भांगे, काँग्रेसचे दासाहेब साठे, शिवसेनेचे शंभुराजे साठे, माढा शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश जगदाळे, दत्तात्र्य आंबुरे, चंद्रशेखर गोटे, संतोष जुगदार, शिवाजी माने, देविदास कदम, हनुमंत पाडुळे, किरण चव्हाण यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी शहरातील दुकाने बंद होती.

हेही वाचा: माढा तालुक्यातील निर्बंध तातडीने हटविण्याची मागणी

माढयामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर टेंभूर्णीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. टेंभूर्णीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते. कुर्डूवाडी शहरामध्येही बंदला सुमारे 80 टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद होती. मोडनिंबमध्येही मुख्य बाजारपेठ बंद होती. मोडनिंबमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मोडनिंबमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी, शिवसेनेचे दीपक सुर्वे, काँग्रेसचे सौदागर जाधव, चंद्रकांत गिड्डे, संभाजी तोडकरी, शिवाजी माळी, किरण तोडकरी, टिल्लू गाडे यांनी बंदचे आवाहन केले.

loading image
go to top