
महात्मा बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागल्यास मंगळवेढ्यामध्ये नवीन पर्यटक वाढून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार होत्या; मात्र मागील सरकारच्या काळात या स्मारकाबाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागू शकला नाही.
मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढ्यातील (Mangalwedha) पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रलंबित जगद्गुरू महात्मा बसवेश्वर (Mahatma Basaveshwar) स्मारकासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आवश्यक त्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केल्यानंतर अजूनही स्मारकाला अन् नव्या समितीला मुहूर्त मिळाला नाही. यामुळे बसवप्रेमी नागरिकांतून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जगद्गुरू महात्मा बसवेश्वरांचे मंगळवेढ्यामध्ये वास्तव्य होते. त्या विचारांचा वारसा पुढे कायम ठेवण्याच्या दृष्टीने व देशभर असलेले बसवप्रेमी मंगळवेढ्यात यावेत म्हणून भाजप सरकारने तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख (Former Guardian Minister Vijaykumar Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती नियुक्ती केली. यासाठी कृषी खात्याकडील जागा निश्चित करून कृषी पर्यटन केंद्र (Agri-tourism center) या नावाने स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली. (The memorial of Mahatma Basaveshwar at Mangalwedha and the committee also did not get approval-ssd73)
यामध्ये ध्यानसाधना मंदिर, ग्रंथालय, निवासस्थान, स्वच्छतागृह आधी सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या. दाखल प्रस्ताव देखभाल दुरुस्ती कुणी करायची, यावरून परत आला. नगरपालिकेने हमी दिल्यावर स्मारक निश्चित झाले. या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागल्यास मंगळवेढ्यामध्ये नवीन पर्यटक वाढून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार होत्या; मात्र मागील सरकारच्या काळात या स्मारकाबाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) अस्तित्वात आले; परंतु मार्च महिन्यातील राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे बसवेश्वर स्मारकासाठी तत्कालीन आमदार स्व. भारत भालके (Bharat Bhalke) यांनी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात आवश्यक त्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केल्यामुळे स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला, या अपेक्षा तालुकावासीयांमध्ये होती. मात्र मार्चपासून ते आजतागायत या स्मारकाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख अध्यक्ष असलेल्या समितीची नव्या सरकारने आजतागायत पुनर्रचना केली नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) महात्मा बसवेश्वर अभ्यासिका केंद्र सुरू झाले आहे, तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या स्मारकाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याविषयी अधिकची माहिती जाणून घेता येईल. नवे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांच्याकडून देखील या प्रश्नासाठी पाठपुरावा अपेक्षित आहे. तर स्व. आमदार भारत भालके यांच्या जागी विद्यमान आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Awtade)) यांचाही समितीत समावेश अद्याप झाला नसल्यामुळे, ज्याप्रमाणे स्मारकाला मुहूर्त मिळाला नाही त्याप्रमाणे नव्या समितीला देखील अद्याप मुहूर्त मिळाला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.