उपाशी पोटाला लॉकडाऊन करता येत न्हाय! मजुरांनी केली आर्थिक मदतीची मागणी

रोपळे व परिसरात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे
 women
womenImages By Whatsup
Updated on

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : कोरोनाच लय भ्या वाटतयं...आमाचा जीव काय वर आलाय व्हयं...पण काय करणार उपाशी पोटाला लॉक डाऊन करता येत न्हाय...! राज्यात संचारबंदी लागू झाली असतानाही कोरोनाच्या सावटाखाली मोल - मजुरीला जाणाऱ्या महिलांनी आपली व्यथा 'सकाळ'शी व्यक्त केली.

कोरोनाची दुसरी लाट जोरात आल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात संचार बंदी जाहिर केली. घरात बसून राहणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून गरजुंना अन्न - धान्य देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज असते. घरातील लोकांचे आजारपण असो वा खानपान असो दररोज पैशांची गरज भासते. म्हणून हातावरचे पोट असलेल्या लोकांना मजुरी करण्याशीवाय पर्याय नाही. रोपळे व परिसरात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विशेषतः माहिलांना अजूनही मोलमजुरी करावीच लागत आहे. सध्या राज्यात कडक संचारबंदी लागू झाली आहे.

आज संचारबंदीतही अनेक महिला मोल मजुरीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्याशी 'सकाळ'ने संवाद साधला, तेव्हा आशाबाई खरे म्हणाल्या, आमच हातावरच पोट हाय घरात बसून आमची चूल पेटणार न्हाय. म्हणून मोलमजुरीला जावच लागत असल्याचे सांगितले. निर्मला खरे यांनी तर कोरोनात कामाला न्हाय गेलो तर घर खर्च कसा भागवायचा ? असाच प्रतिप्रश्न केला. सुकमरा खरे यांनी कोरोनासाठी आम्ही तोंडाला रुमाल बांधून स्वतःची काळजी घेत असल्याचे सांगितले .

"सरकारने कोरोनाच्या काळात आमच्या सारख्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांसाठी महिन्याला तीन हजार रूपयाची मदत द्यावी."

- आशाबाई खरे, महिला मजूर, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com