
मुंबई-पुण्यातील नागरीकरणाला आता सूज आली आहे. या शहरांनी वाढीच्या मर्यादाही कधीच ओलांडल्या आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील पहिल्या पाच शहरांमध्ये ज्याचा समावेश होतो, त्या सोलापूरला सर्वार्थाने विकसित होण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. गरज आहे ती फक्त व्हिजन असलेल्या नेतृत्वाची, संपूर्ण जिल्हा डोळ्यासमोर ठेवून आणि उपलब्ध संधी सोलापूरकरांसाठी खेचून आणण्याची, ‘अस्सल सोलापुरी’ हा ब्रँड जगभर पोचविण्याची. यासाठीच जनसेवेचा वसा पुढे घेऊन ‘रायझिंग सोलापूर’साठी लोकसहभागातून चळवळ उभारण्यासाठी एक पाऊल टाकत आहोत.