प्रशासनाचे दुर्लक्ष! महापालिकेजवळच चिमुकल्यांसमवेत सिग्नलवर पैसे मागतात बेघर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 beggars

सिग्नलवर भिक मागणारे कोण, शहरातील की बाहेरील, त्यांना नातेवाईक आहेत का, याचा शोधही प्रशासनाला लागलेला नाही.

महापालिकेजवळच चिमुकल्यांसमवेत सिग्नलवर पैसे मागतात बेघर

सोलापूर: स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळवत असलेल्या सोलापूर शहरात आता सिग्नलवर भिक मागणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मंदिर, स्मशानभूमीसमोर मागून खाणाऱ्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी प्रशासनाला निवेदनही दिले होते. मात्र, त्यात काहीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही. सिग्नलवर भिक मागणारे कोण, शहरातील की बाहेरील, त्यांना नातेवाईक आहेत का, याचा शोधही प्रशासनाला लागलेला नाही.

हेही वाचा: विद्यार्थ्यांना 3 तासांचीच शाळा! दिवाळी सुट्टीवर प्रश्‍नचिन्ह

महापालिकेचे कुमठा नाका परिसरात बेघर निवारा केंद्र आहे. शहरातील बेघर, सिग्नलवर भिक मागणाऱ्यांना शोधून त्यांची सोय बेघर केंद्रात करून त्यांना दोनवेळचे जेवण, चहा, नाष्टा, त्यांची राहण्याची सोय, कपडे, दररोज वापरायचे साहित्य पुरविण्यासाठी महापालिकेने एक संस्था नियुक्‍त केली आहे. दरवर्षी त्या संस्थेला अंदाजित नऊ लाख रुपये दिले जातात. तरीही, शहरात बेघर तथा भिक मागून खाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसत आहे. डफरीन चौक ते जुना एम्प्लॉयमेंट चौक मार्गावरील मारुती मंदिर, रेल्वे स्थानक परिसरातील शनी मंदिर, मोदी स्मशानभूमीसह अन्य ठिकाणी अशा व्यक्‍तींची संख्या मोठी असल्याचे चित्र पहायला मिळते. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, परंतु स्वत:चा अथवा इतरांचा जीव धोक्‍यात घालून जगणे हा गुन्हा समजला जातो. त्या व्यक्‍तींना हक्‍काचा निवारा देणे हे त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नसल्याने शहरातील सिग्नलवर आणि मंदिर, स्मशानभूमीबाहेर भिक मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे.

हेही वाचा: खरंय का? लस न घेणाऱ्यांना रेशनचे धान्य नाही अन्‌ एसटी प्रवासही बंद

महापालिकेच्या "बेघर'ची स्थिती

-एकूण क्षमता- 76

-सध्या असलेले बेघर- 26

-दरवर्षीचा अंदाजित खर्च- 12 लाख

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पार

भिक मागणाऱ्यांना कोरोनाचा धोका

महापालिकेपासून हाकेच्या अंतरावरील डफरीन चौकात आणि विजयपूर रोडवरील पत्रकार भवन चौकासह अन्यत्र चिमुकल्यांना सोबत किंवा काखेत घेऊन भिक मागणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. अनवाणी वावरणाऱ्या या लोकांच्या तोंडाला मास्कदेखील दिसत नाही. त्यांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतली आहे की नाही, याचीही माहिती प्रशासनाकडे नाही. सिग्नलच्या ठिकाणी वाहनांची गर्दी झाल्यानंतर त्या गर्दीतून वाट काढत ते वाहनधारकांना पैसे मागताना दिसतात. त्याठिकाणी वाहतूक पोलिस असतात, तसेच त्या मार्गावरून अनेक पोलिस व महापालिकेचे अधिकारी ये-जा करतात. तरीही, त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही हे विशेष.

हेही वाचा: स्वच्छता-वक्तशीरपणात मध्य रेल्वेत सोलापूर विभाग सर्वोत्कृष्ट

शहरातील बेघरांना निवारा मिळावा या हेतूने महापालिकेच्या वतीने एक बेघर केंद्र उघडण्यात आले आहे. परंतु, अनेकजण तिथून पसार होतात. आता पुन्हा एकदा त्या व्यक्‍तींचा सर्व्हे करून त्यांना बेघर निवारा केंद्रात आणले जाईल.

- चंद्रकांत मुळे, शहर अभियान व्यवस्थापक, सोलापूर महापालिका

Web Title: The Number Of Beggars On The Signal Is Increasing In The City Of Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Beggars
go to top