गळ्याला चाकू लावून तरुणाचे अपहरण ! बार्शीत सात जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kidnaping

मागील भांडणाचा राग मनात ठेवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सात जणांनी मुलास गळ्याला चाकूचा धाक दाखवत सोलापूर रोडवरील नातेवाइकांच्या घरातून चारचाकी वाहनातून पळवून नेले.

गळ्याला चाकू लावून तरुणाचे अपहरण ! बार्शीत सात जणांवर गुन्हा

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : मागील भांडणाचा राग मनात ठेवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सात जणांनी मुलास गळ्याला चाकूचा धाक दाखवत सोलापूर रोडवरील नातेवाइकांच्या घरातून चारचाकी वाहनातून पळवून नेले (Kidnaped). याबाबत बार्शी शहर पोलिसांत (Barshi City Police) सातजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (The youth was abducted from the vehicle with a knife to his neck)

हेही वाचा: कोरोनामुळे बालके अनाथ! 592 दत्तक; हे आहेत दत्तक घेण्याचे नियम

चंदन बाळासाहेब मस्के, आदित्य बाळासाहेब मस्के, आदर्श बाळासाहेब मस्के (तिघे रा. कासारवाडी रोड), वेदांत गौतम ननावरे, आदित्य धनेश ननावरे, रोहन मिलिंद ननावरे, भीमराव किसन लोंढे (सर्व रा. भीमनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दीपक बोकेफोडे यांनी फिर्याद दाखल केली. ही फिल्मी स्टाईल घटना गुरुवारी (20 मे) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली. संशयित आरोपींनी प्रेम बोकेफोडे (वय 19, रा. भीमनगर) यास पळवून नेले आहे.

प्रेम व त्याच्या मित्रांनी 17 मे रोजी आदित्य मस्के यास मारहाण केली, असा गुन्हा दाखल झाला असून, मुलगा प्रेम सोलापूर रोड येथील नातेवाइकांकडे राहण्यास होता. चंदन मस्के याने घरी येऊन, तुझा मुलगा सापडला की जिवंत सोडत नाही, अशी धमकी दिली होती.

सोलापूर रोडवरील नातेवाइकांच्या घरी जाऊन प्रेम याच्या गळ्यास चाकूचा धाक दाखवून बळजबरीने वाहनात बसवून पळवून नेले, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार करीत आहेत.

loading image
go to top