esakal | विद्यापीठाने केली परीक्षेची वेळ कमी! "प्रॉक्‍टरिंग' प्रणालीतून हालचालींवर नजर
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur University

विद्यापीठाने केली परीक्षेची वेळ कमी! प्रॉक्‍टरिंग प्रणालीतून हालचालींवर नजर

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

कोरोनामुळे सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा सध्या ऑनलाइन होत आहेत. विद्यार्थी घरबसल्या पेपर सोडवत असून परीक्षेत पारदर्शकता राहावी म्हणून प्रॉक्‍टरिंग प्रणालीचा वापर केला आहे.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा सध्या ऑनलाइन (Online Exam) होत आहेत. विद्यार्थी घरबसल्या पेपर सोडवत असून परीक्षेत पारदर्शकता राहावी म्हणून प्रॉक्‍टरिंग प्रणालीचा (Proctering system) वापर केला आहे. परीक्षेची लिंक आता तीनऐवजी फक्त दोन तासच ओपन राहणार असून, त्यातील एका तासात परीक्षार्थींनी आपला पेपर सोडवायचा आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत इतर विद्यापीठांच्या तुलनेत लवकर परीक्षा सुरू केली आहे. (The proctering system is being used in the online exams of Solapur University)

हेही वाचा: "पीएसआय'ने स्वीकारली साडेसात लाखांची लाच! "लाचलुचपत'ने पकडले रंगेहाथ

सध्या शिक्षणशास्त्र (बी.एड.) (B.Ed) व एलएलबीची (LLB) परीक्षा सुरू आहे. आजपासून (शनिवारी) बीए, बीकॉम, बीएस्सी, एमए, एमकॉम, एमएस्सी, फार्मसी, अभियांत्रिकीच्या सत्र परीक्षा सुरू होणार आहेत. जवळपास 38 हजार विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार असून ही परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे. तत्पूर्वी, परीक्षेची लिंक ओपन करताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्याने तीन तासांपर्यंत लिंक ओपन ठेवण्यात येत होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी त्याचा गैरफायदा घेतल्याची बाब निर्दशनास आली. त्यामुळे आता ही लिंक फक्त दोन तासच खुली राहणार आहे. यातील एका तासात परीक्षार्थींनी आपला पेपर सोडवायचा आहे.

ऑनलाइन परीक्षेत पारदर्शकता यावी म्हणून विद्यापीठाने प्रॉक्‍टरिंग प्रणालीचा वापर केला. परीक्षेची लिंक तीन तासांऐवजी आता दोन तासच ओपन राहील, असाही निर्णय घेतला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत सुरू आहेत.

- डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग, सोलापूर विद्यापीठ

हेही वाचा: पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या "या' संस्थेत सरकारी नोकऱ्यांची संधी!

ठळक बाबी...

  • सकाळी दहा ते दुपारी बारा तर, दुपारी साडेबारा ते अडीच या दोन सत्रात विद्यार्थ्यांची परीक्षा

  • शनिवारपासून सर्वच अभ्यासक्रमाची परीक्षा; 38 हजार परीक्षार्थी

  • एक प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना एक तासाचा अवधी

  • विद्यार्थ्यांना दिलेली पेपरची लिंक केवळ दोन तासच खुली राहणार

  • पुस्तकात अथवा इतरांना विचारून उत्तरे लिहिणाऱ्यांवर प्रॉक्‍टरिंग प्रणालीचा वॉच

loading image