esakal | IITM Pune Recruitment 2021 : पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या "या' संस्थेत सरकारी नोकऱ्यांची संधी!
sakal

बोलून बातमी शोधा

IITM Pune

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या "या' संस्थेत सरकारी नोकऱ्यांची संधी!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

पृथ्वी विज्ञान मंत्रालयात सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे.

सोलापूर : IITM Pune Recruitment 2021 : पृथ्वी विज्ञान मंत्रालयात (Ministry of Earth Sciences) सरकारी नोकरीची (Government job) इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. मंत्रालयांतर्गत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी (आयआयटीएम) (Indian Institute of Tropical Meteorology)ने विविध पदांच्या एकूण 156 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संस्थेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार प्रकल्प वैज्ञानिक, फील्ड वर्कर, प्रोग्राम मॅनेजर व इतर पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आयआयटीएम पुणे (IITM Pune) यांनी जाहीर केलेल्या या पदांसाठी अल्प मुदतीच्या कराराच्या आधारावर उमेदवारांची भरती होणार आहे, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. (There are government job opportunities in IITM Pune institute of the Ministry of Earth Sciences)

हेही वाचा: इंडियन नेव्हीमध्ये मॅट्रिकच्या भरतीसाठी अधिसूचना जारी !

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार आयआयटीएम पुणे भरती 2021 साठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर tropmet.res.in उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्जाच्या माध्यमाने 1 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 5 जुलैपासून सुरू सुरू झाली आहे; मात्र काही पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 जुलैपासून सुरू होणार आहे. या पदांच्या तपशिलासाठी आणि अर्ज करण्यासाठी व आवश्‍यक सूचनांसाठी भरती अधिसूचना पाहा. आयआयटीएम पुणे भरती 2021 अधिसूचना तपासण्यासाठी https://www.tropmet.res.in/jobs_pdf/1625232710PER-01-2021.pdf या लिंकवर क्‍लिक करा. ऑनलाइन अर्जासाठी https://www.tropmet.res.in/Careers येथे क्‍लिक करा.

हेही वाचा: 'इग्नू'ने केला बीएड प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर! 'या' लिंकवरून पाहा निकाल

या पदांसाठी होणार भरती

 • प्रोजेक्‍ट असिस्टेंट - 09 पदे

 • फील्ड वर्कर - 02 पदे

 • यूडीसी - 09 पदे

 • प्रोजेक्‍ट एसोसिएट - 24 पदे

 • प्रोजेक्‍ट कन्सल्टंट - 01 पद

 • प्रोजेक्‍ट सायंटिस्ट - 88 पदे

 • प्रोग्राम मॅनेजर - 02 पदे

 • सेक्‍शन ऑफिसर - 03 पदे

 • सिनिअर प्रोजेक्‍ट एसोसिएट - 05 पदे

 • ट्रेनिंग कोऑर्डिनेटर - 01 पद

 • टेक्‍निकल सहाय्यक - 08 पदे

 • वैज्ञानिक प्रशासनिक सहाय्यक - 03 पदे

 • कार्यकारी प्रमुख - 01 पद

loading image