esakal | Pandharpur : विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पुस्तक प्रकाशन केल्याने नवा वाद! समिती सदस्याकडूनच नियमांना हरताळ
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पुस्तक प्रकाशन केल्याने नवा वाद!

मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे यांनीच मंदिर समितीच्या नियमांना हरताळ फासून विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पुस्तक प्रकाशन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पुस्तक प्रकाशन केल्याने नवा वाद!

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेले दीड वर्ष श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर (Vitthal-Rukmini Mandir, Pandharpur) भाविकांना दर्शनासाठी बंदी होते. आता कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना विठ्ठल - रुक्‍मिणीचे मुखदर्शन सुरू करण्यात आले आहे. असे असतानाच, मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे (Atul Shastri Bhagare) यांनीच मंदिर समितीच्या नियमांना हरताळ फासून विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पुस्तक प्रकाशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर वारकरी पाईक संघाने अतुल शास्त्री भगरे यांच्यासह मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा: सेंद्रिय गुळाचा 'यादवबाग' ब्रॅंड! मारापूरच्या हरिभाऊ यादवांचा प्रयोग

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल - रुक्‍मिणी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. आषाढी, कार्तिकी यासह विविध सणांच्या कालावधीत भाविकांना मंदिरातील श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचे दर्शन घेता आले नाही. मात्र दीड वर्षापासून बंद असलेले विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर घटस्थापनेपासून भाविकांना मुखदर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून व सोशल डिस्टन्सिंग ठेवून भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे यांनी मंदिर समितीचे सर्व नियम मोडून दोन दिवसांपूर्वी थेट देवाच्या गाभाऱ्यात जाऊन पुस्तक प्रकाशन केले आहे.

अतुल शास्त्री भगरे यांच्या या पुस्तक प्रकाशनानंतर वारकरी व भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी बंदी असताना मंदिर समिती सदस्यांना थेट देवाच्या पायाजवळ प्रवेश कसा काय देण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यानंतर आता नवा वाद समोर आला आहे.

loading image
go to top