राज्याच्या सत्तेतील 'घड्याळ' जिल्ह्यात मात्र गुरफटलंय गटबाजीत!

राज्याच्या सत्तेतील 'घड्याळ' सोलापूर जिल्ह्यात मात्र गुरफटलंय गटबाजीत!
NCP
NCPSakal
Summary

सोलापूरच्या ग्रामीण राष्ट्रवादीत पूर्वी अकलूजविरुद्ध निमगाव असा मुख्य संघर्ष होता. आता मात्र...

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण राष्ट्रवादीत (NCP) पूर्वी अकलूजविरुद्ध (Akluj) निमगाव (Nimgaon) असा मुख्य संघर्ष होता. अकलूजवाले भाजपमध्ये (BJP) गेले. निमगाववाले संधी असूनही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शांत झाले. जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत गटबाजीची नवी केंद्रं आता जन्माला आली आहेत. अनगर (Anagar) विरुद्ध नरखेड (Narkhed), वडाळा (Wadala) विरुद्ध जवळा (Javala) आणि वडाळा विरुद्ध कुमठे (Kumthe) ही राष्ट्रवादीतील छुपी गटबाजी जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून समोर आली. राज्याच्या सत्तेतील 'घड्याळ' सोलापूर जिल्ह्यात मात्र गटबाजीत गुरफटले आहे. माजी महापौर महेश कोठेंच्या (Mahesh Kothe) माध्यमातून सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटबाजीवर उत्तर दिलेली राष्ट्रवादी जिल्ह्यातील गटबाजीवर काय तोडगा काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (The ruling Nationalist Congress Party, however, got involved in factionalism in the district)

NCP
पडक्‍या वाड्याची पाटीलकी..!

2019 मध्ये राष्ट्रवादीला नेत्यांची गरज असताना आमदारकीच्या शोधात दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत सांगोला गाठले. त्यांना उमेदवारी मिळाली. परंतु शेवटपर्यंत लढण्याची संधी काही मिळाली नाही. आता तेच जिल्हाध्यक्षपद मिळविण्यासाठी साळुंखे यांनी गेल्या काही महिन्यात वारंवार प्रयत्न केल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. यावेळी जिल्हाध्यक्षपद मिळविण्यासाठी सोलापुरातून मुंबईत (Mumbai) जाण्याऐवजी मुंबईतून सोलापुरात येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. साळुंखे यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील (Umesh Patil) यांच्या गळ्यात पडणारी जिल्हाध्यक्षपदाची माळ रोखण्यासाठी बळिराम साठे (Baliram Sathe) यांचे नाव आयत्यावेळी समोर आले. वडाळ्यामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यातील डाव-प्रतिडाव असो की पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जिल्हाध्यक्षांच्या वाढत्या वयाबद्दलची खबर पोहोचविण्याचे काम असो, यामुळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीतील गटबाजी धुमसतच राहिली.

माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) येत्या काळात राष्ट्रवादीत येतील अशी दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. ते राष्ट्रवादीत येण्यापूर्वीच उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीचे सभापतिपद आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद यामुळे माजी आमदार दिलीप माने-जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्यातील संबंध टोकाला गेले आहेत. भविष्यात माने यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाल्यास साठे काय करणार? 2017 च्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीप्रमाणे पुन्हा भाजपची साथ पसंत करणार की उत्तर सोलापूर (North Solapur) तालुक्‍यात मोहोळप्रमाणे (Mohol) प्रति राष्ट्रवादी तयार करणार? याबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) व करमाळ्याचे (Karmala) अपक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी आपली भूमिका गुपितच ठेवली. त्यांच्या मनात कोणाचे नाव आहे? यावर देखील बरेच काही अवलंबून आहे.

फार्महाउस तिऱ्हेचे अन्‌ सोनक्‍याचे

राजकीय नेत्यांचे फार्महाउस या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत येतात. गेल्या आठवड्यात जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार दिलीप माने यांचे तिऱ्हे येथील (ता. उत्तर सोलापूर) फार्महाउस व माजी आमदार दीपक साळुंखे यांचे सोनके (ता. पंढरपूर) येथील फार्महाउस भलतेच चर्चेत आले होते. जिल्ह्याच्या राजकारणातील व सहकारातील नेत्यांची महत्त्वाची बैठक तिऱ्हे येथे झाल्याने ते फार्महाउस चर्चेत आले होते. सोनके येथील फार्महाउसमध्ये झालेल्या खलबतांमुळे साळुंखे यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत आल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली होती.

NCP
सोलापूर 'सिव्हिल'मधील डॉक्‍टर्स व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

अजितदादा बोलले, काका टिकले

प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mundhe), विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांच्यासह राज्याच्या राजकारणातील काही आजी-माजी मंत्र्यांची मर्जी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर आहे. सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी साळुंखे यांना संधी मिळावी यासाठी सोलापूर जिल्ह्यापेक्षा राज्यस्तरावरून अधिक प्रयत्न होताना दिसत आहेत. जिल्ह्याची वस्तुस्थिती वेगळी आणि वरिष्ठस्तरावर होणारे प्रयत्न वेगळे यामुळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. पुढील निवडणुका होईपर्यंत जिल्हाध्यक्षपदावर बळिराम साठे यांनाच ठेवायचे फर्मान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काढले. त्यामुळे पुढील किमान काही महिने तरी साठे निश्‍चिंत झाले आहेत. कॉंग्रेसचा हात सोडून हाती 'घड्याळ' बांधण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांच्या प्रवेशानंतरच नव्या जिल्हाध्यक्षांचा विषय पुन्हा समोर येण्याची शक्‍यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com