पुण्यातील बालिकेचा गुप्त पद्धतीने होणारा बालविवाह मोहोळ येथे रोखला !

पुण्यातील बालिकेचा गुप्त पद्धतीने होणारा विवाह मोहोळ येथे रोखला !
बालविवाह
बालविवाहe sakal
Updated on: 
Summary

शाळा बंद असल्याने घरातील मुलींचे शिक्षण थांबले व अशा परिस्थितीत बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे उद्योग- व्यवसाय बंद पडले. शाळा बंद असल्याने घरातील मुलींचे शिक्षण थांबले व अशा परिस्थितीत बालविवाहाचे (Child Marriage) प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मोहोळ तालुक्‍यात (Mohol taluka, district Solapur) गुरुवारी (ता. 5) असाच सुरू असलेला बालविवाहाचा प्रकार रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण विभागाला (District Child Protection Department) यश मिळाले आहे. विवाह होणाऱ्या बालिकेचे वय अवघे सोळा वर्षे असल्याचे निदर्शनास आल्याने हा विवाह रोखण्यात आला.

बालविवाह
आबासाहेबांनंतर शेकापला एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस !

पुणे (Pune) येथील एका 16 वर्षीय बलिकेचा बालविवाह गुप्त पद्धतीने विठ्ठल मंदिर, कोळेगाव, तालुका मोहोळ येथे गुरुवारी (ता. 5) दुपारी 12.30 वाजता होणार असल्याची गुप्त माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सोलापूर यांना आज (गुरुवारी) पहाटे मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, शमीम पटेल, तालुका संरक्षण अधिकारी उज्ज्वला कापसे, पोलिस निरीक्षक अशोक सायकर, पोलिस हवालदार शेख, चाइल्ड लाइनचे श्रीदेवी रजपूत, योगेश स्वामी यांचे पथक कोळेगावच्या दिशेने बालविवाह रोखण्यास रवाना झाले.

बालविवाह
मित्राकडून 19 कोटींची फसवणूक ! बनावट स्वाक्षरीने विकले फ्लॅट

हे पथक विवाहस्थळी पोचले असता बालविवाह नसल्याचे निदर्शनास आले. संबंधित बालिकेच्या पालकांस बालविवाह रोखण्यास पोलिस पथक येणार असल्याची खबर मिळाल्याने विवाहाचे ठिकाण बदलले असावे, या अंदाजाने सदरील पथकाने विठ्ठल मंदिराच्या व आजूबाजूच्या परिसरात पाहणी करीत असताना एका ठिकाणी घरासमोर लग्न मंडप दिसून आला. त्या घरी पथकाने जाऊन पाहणी केली असता हळदीचा कार्यक्रम होत असल्याचे दिसून आले. लग्न मंडपात पथकाने चौकशी केली असता ज्या बलिकेचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती, त्या बालिकेचे लग्न नसून दुसऱ्या एका मुलीचे लग्न होत असल्याचे समजले. हळद लागलेल्या नवऱ्या मुलीस नाव व जन्मतारीख विचारली असता तिचे वय 16 वर्षे असल्याचे निदर्शनास आले. सदर हळद लागलेल्या बालिकेस पथकाने आई, वडिलांसह ताब्यात घेऊन होणारा बालविवाह थांबवून पोलिस स्टेशन, मोहोळ येथे जबाब नोंदवून बालिकेला बाल कल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर हजर केले असता, बाल कल्याण समितीने बालिकेची बालगृहात रवानगी केली.

हा बालविवाह रोखण्याबाबतची यशस्वी कार्यवाही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com