आबासाहेबांनंतर शेकापला एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस !

आबासाहेबांनंतर शेकापला एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस !
आबासाहेबांनंतर शेकापला एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस!
आबासाहेबांनंतर शेकापला एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस!Canva
Summary

माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सांगोला तालुक्‍याच्या पक्षीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सांगोला (सोलापूर) : सांगोला (Sangola) हा शेतकरी कामगार पक्षाचा (Shetkari Kamgar Paksh) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (Former MLA Ganpatrao Deshmukh) यांच्या निधनाने सांगोला तालुक्‍याच्या पक्षीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शेकापमध्ये आबासाहेबांचा शब्द अंतिम मानला जात होता. परंतु, गणपतराव आबांच्या निधनाने तालुक्‍यातील शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी यापुढे नेतृत्वाचा कस लागणार आहे. सद्य:स्थितीत शेकाप एकसंघ ठेवण्यासाठी पक्षातील सामूहिक नेतृत्वाने प्रयत्न केले पाहिजेत.

आबासाहेबांनंतर शेकापला एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस!
मित्राकडून 19 कोटींची फसवणूक ! बनावट स्वाक्षरीने विकले फ्लॅट

शेकाप म्हटलं की सांगोला हे समीकरण दृढ झाले होते. माजी आमदार कै. गणपतराव देशमुख 1962 सालापासून सांगोला मतदारसंघात अकरा वेळा निवडून आले होते. 1972 मध्ये कॉंग्रेसचे काकासाहेब साळुंखे-पाटील व 1995 मध्ये आमदार शहाजी पाटील यांच्याकडून फक्त दोन वेळा पराभव त्यांचा झाला होता. तालुक्‍याच्या राजकारणामध्ये विशेषत: शेकापमध्ये गणपतरावांचा शब्द हा अंतिम मानला जात होता. ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद असो किंवा विधानसभेची निवडणूक असो आबासाहेब सर्वांशी चर्चा करून जनतेला हवा तोच निर्णय घेत होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत सामान्य मतदार त्यांना "आपण आदेश द्या, आम्ही त्याचे पालन करू' असे आग्रहाने बोलत होते. त्यामुळे आजपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे व नाराजीचा सूर जास्त होत नव्हता. झाला तरी आबासाहेब त्यावर सर्वांशी चर्चा करून निश्‍चितपणे तोडगा काढत होते. त्यामुळे तालुक्‍यात शेकाप म्हणजेच गणपतराव देशमुख असे एक समीकरण झाले होते.

आबासाहेबांनंतर शेकापला एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस!
जिल्ह्यातील 'या' पाच तालुक्‍यांमध्ये कडक लॉकडाउन? शुक्रवारी निर्णय

परंतु गणपतराव आबांच्या निधनामुळे तालुक्‍यात सर्व कार्यकर्त्यांना सामावून, त्यांच्याशी विचारविनिमय करून आणि हवा तो योग्य निर्णय घेण्यासाठी, शेकापची ताकद आहे तशीच ठेवून ती वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी, येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेकापचे प्राबल्य दाखवण्यासाठी आता पक्षाच्या नेतृत्वाची मोठी कस लागणार आहे. शेकापमध्ये त्यासाठी या अगोदरपासून आबासाहेबांबरोबर असणारे त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख, विधानसभा निवडणूक लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख व नुकतेच कार्यकर्त्यांचा व कोरोनाच्या महामारीच्या काळात गावपातळीवरील सामान्य कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवणारे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह तालुक्‍यातील असणाऱ्या इतर नेतृत्वाने सामूहिकरीत्या प्रयत्न करण्याची गरज आहे. सामूहिक नेतृत्वानेच शेकाप शहरापासून ग्रामीण भागापर्यंत एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा सामान्यांमधून व्यक्त होत आहे.

असे बोलू नका, खाली बसा

तालुक्‍यात कोणतेही आंदोलन किंवा राजकीय सभा असो, आबासाहेब समोर असताना कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी इतर पक्षावर पक्षाच्या नेतृत्वावर खालच्या पातळीत बोलायला सुरवात केल्यास आबासाहेब त्वरित हातात माईक घेऊन "असे बोलू नका, खाली बसा' असे सुनावले की कोणीही विरोधकांवर टीका करतानाही आबासाहेबांसमोर विचार करून बोलत असे.

आबासाहेबांनंतर शेकापला एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस!
सर... ये बात कुछ हजम नही हुई !

...तर माझे आयुष्य फुकट गेले

यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी निवडणुकीत उभा राहणार नसलो तरी राजकारण सोडले असे नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी सामान्यांची सेवा करीन. परंतु माझ्यानंतर शेकाप तालुक्‍यात राहणार नसेल तर माझे आयुष्य फुकट गेले, असे ते एका सभेत आवर्जून बोलले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com