
सोलापूर: लोकमान्य टिळक यांच्यावर इंग्रजांनी १८९७ मध्ये पहिला राजद्रोहाचा खटला भरला, त्यावेळेस आधुनिक सोलापूरचे शिल्पकार अप्पासाहेब वारद यांनी टिळकांना जामीन मिळवून देण्याचे काम केले होते. सोलापुरातील एक श्रीमंत गृहस्थ मल्लिकार्जुनप्पा पसारे यांचे पुण्यातील मेहुणे व सधन व्यापारी उरवणे शेठ यांचा जामीन मिळवून देण्यात वारद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशी माहिती ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे योगदान’ या ग्रंथाचे लेखक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी दिली.