esakal | हॅकर्सच्या रडारवर सायबरतज्ज्ञ ! केले फेसबुक अकाउंट क्‍लोनिंग

बोलून बातमी शोधा

Kakkalmeli

हॅकर्सच्या रडारवर सायबरतज्ज्ञ ! केले फेसबुक अकाउंट क्‍लोनिंग

sakal_logo
By
अनुराग सुतकर

सोलापूर : शासनाच्या "ब्रेक द चेन'च्या अनुषंगाने लॉकडाउन जाहीर झाला. या काळात कोरोनावर जरी प्रतिबंध घालण्यास मदत होत असली तरी मात्र सायबर क्राईमचे गुन्हे वाढल्याचे निदर्शनास येत आहेत. या वेळी तर हॅकर्सनी सोलापूर शहरातील सायबर क्राईम कायद्याचे अभ्यासक ऍड. मंजुनाथ कक्कळमेली यांचे फेसबुक अकाउंट क्‍लोनिंग करून त्यांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना पैसे मागितल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत हकिकत अशी, की शनिवारी (ता. 24) सायंकाळी ऍड. कक्कळमेली यांचे फेसबुक अकाउंट हे हॅकर्सनी क्‍लोनिंग केले. एवढ्यावरच न थांबता हॅकर्सनी कक्कळमेली यांच्या संपर्कातील जवळच्या व्यक्तींना मेसेज करून पैशाची मागणी केली. परंतु ज्या व्यक्तींना या अकाउंटवरून मेसेज आले होते, त्यांनी वेळीच सतर्क राहात ऍड. कक्कळमेली फोन केला. त्यानंतर कक्कळमेली यांनी "त्या अकाउंटला लगेच रिपोर्ट करा आणि कुणीही त्या अकाउंटला पैसे पाठवू नये' असे सांगितले. सध्या ते फेसबुक अकाउंट बंद झाले आहे. यातून हॅकर्स सायबर तज्ज्ञांची देखील फसवणूक करू शकतात, हे सिद्ध झालं आहे. परंतु आपण सतर्क राहिलो तर कोणाचीच फसवणूक होऊ शकत नाही, हे मात्र नक्की.

हेही वाचा: ""सांडपाणी' या शब्दाचा खेळ करून "उजनी'तून पाणी उचलण्याचा घाट !'

अकाउंट क्‍लोनिंग म्हणजे काय?

कोणत्याही सोशल मीडियावरील अकाउंटसारखेच तंतोतंत जुळेल असे दुसरे अकाउंट ओपन करणे म्हणजे अकाउंट क्‍लोनिंग होय. यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडियांचा वापर केला जातो. आपली पर्सनल इन्फॉर्मेशन जेवढी पब्लिक दिसते तेवढी इन्फॉर्मेशन, तसेच आपल्या सोशल मीडियाचा प्रोफाइल फोटो देखील आहे तसाच वापरून नवे अकाउंट काढले जाते.

विशेषतः अशा वेळी आपण घाबरून न जाता वेळेत सतर्क राहणे कधीही चांगले. मला जेव्हा कळाले की, माझे फेसबुक अकाउंट कोणीतरी क्‍लोन केले आहे, तर मी लगेच रिपोर्ट करून ते अकाउंट बंद पाडले. सायबर क्रिमिनल्सचा उद्देश हा मुख्यतः पैशाची मागणी करणे त्यासोबतच त्या व्यक्तीचे चारित्र्य समाजात मलीन करणे असतो.

- ऍड. मंजुनाथ कक्कळमेली, सायबर कायदे अभ्यासक