रंगीबेरंगी पतंग, फळभाज्या-फुलांनी सजले विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर

संक्रांतीनिमित्त रंगीबेरंगी पतंग, फळभाज्या-फुलांनी सजले विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर
संक्रांतीनिमित्त रंगीबेरंगी पतंग, फळभाज्या-फुलांनी सजले विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर
संक्रांतीनिमित्त रंगीबेरंगी पतंग, फळभाज्या-फुलांनी सजले विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरSakal
Summary

मंदिरात आज जिकडे पाहावे तिकडे भाज्या आणि रंगीबेरंगी पतंग पाहायला मिळत आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) निमित्ताने श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात (Shri Vitthal-Rukmini Temple) तब्बल साठ प्रकारच्या फळभाज्या (vegetables), विविध प्रकारची फुले (Flowers) तसेच तिळगूळ आणि 1 हजार रंगीबेरंगी पतंगांचा (Kites) वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सुमारे दीड टन फळभाज्या आणि फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. फळभाज्या आणि पतंग हे आजच्या सजावटीचे खास वैशिष्ट्य आहे. मंदिरात आज जिकडे पाहावे तिकडे भाज्या आणि रंगीबेरंगी पतंग पाहायला मिळत आहेत. विविध प्रकारच्या भाज्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात आल्याने संत सावता माळी (Saint Sawta Mali) यांच्या 'कांदा, मुळा, भाजी; अवघी विठाई माझी' या अभंगाची भाविकांना आठवण येत आहे. (The Vitthal-Rukmini temple is decorated with colorful flowers and vegetables on the occasion of Sankranti)

संक्रांतीनिमित्त रंगीबेरंगी पतंग, फळभाज्या-फुलांनी सजले विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर
ZP आरोग्य विभागातील 7 तर 'सिव्हिल'मधील 46 कर्मचारी कोरानाबाधित

विविध सण आणि राष्ट्रीय उत्सव, एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक मनमोहक सजावट केली जाते. अनेक भाविक त्यासाठी आधी मंदिर समितीशी संपर्क साधून आवश्‍यक ती फुले आणि फळे उपलब्ध करून देत असतात. आजच्या सजावटीसाठी राहुल ताम्हाणे, राजू नाईक, सचिन शितोळे, अमोल शेरे यांनी फळभाज्या आणि फुले उपलब्ध करून दिली आहेत.

गवार, भेंडी, फ्लॉवर, मुळा, गाजर, वांगी, कोबी, बीट, दोडका आदी साठ प्रकारच्या फळभाज्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे. तिळगुळासह झेंडू, शेवंती अशी फुले आणि रंगीबेरंगी पतंग देखील सजावटीसाठी वापरण्यात आले आहेत. फळभाज्या आणि पतंग हे आजच्या सजावटीचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे संत सावता माळी यांच्या 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' या अभंगाची भाविकांना आठवण येत आहे.

संक्रांतीनिमित्त रंगीबेरंगी पतंग, फळभाज्या-फुलांनी सजले विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर
तिसऱ्या लाटेतही 'डेल्टा'चे रुग्ण! सौम्य लक्षणांची रुग्णसंख्या अधिक

मंदिरात आज जिकडे पाहावे तिकडे भाज्या आणि रंगीबेरंगी पतंग पाहायला मिळत आहेत. ताम्हाणे फ्लॉवर डेकोरेटसर्स, पुणे (Pune) व साई डेकोरेटर्स, शिंदे ब्रदर्स पंढरपूर (Pandharpur) यांनी आरास डेकोरेशनचे काम केले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी गजानन गुरव (Gajanan Gurav) आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड (Balaji Pudalwad) यांनी दिली. संक्रांतीच्या निमित्ताने भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली आहे. मंदिर समितीने दर्शन सुरू ठेवले आहे, परंतु मंदिरात वाणवसा करण्यास मनाई केलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com