esakal | 'उजनी' @ 70.43 टक्के! पाणीसाठ्यात होतेय वाढ; शेतकऱ्यांमधून समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

'उजनी' @ 68.48 टक्के! पाणीसाठ्यात होतेय वाढ; शेतकऱ्यांमधून समाधान

यापुढेही मोठा व दमदार पाऊस होवो व उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरो, अशी प्रार्थना शेतकरीवर्ग गणरायापुढे करीत आहेत.

'उजनी' @ 70.43 % ! पाणीसाठ्यात होतेय वाढ; शेतकऱ्यांमधून समाधान

sakal_logo
By
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

केत्तूर (सोलापूर) : मध्यंतरी जवळजवळ महिनाभर पावसाने मोठा ब्रेक घेतल्याने सोलापूर (Solapur), पुण्यासह (Pune) नगर (Nagar) जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयाचा (Ujani Dam) पाणीसाठा 62 टक्‍क्‍यांच्या आसपास रेंगाळला होता. तर गेल्या काही दिवसांत या पाणी साठ्यामध्ये वाढ होण्याऐवजी घट होऊन तो 60 टक्‍क्‍यांवर आला होता. परंतु, गेल्या दोन- चार दिवसांपासून धरण साखळी, परिसर, भीमा खोरे तसेच पुणे परिसरात होत असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील पानशेत, चासकमान, पवना, डिंभे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामधून येणारे अतिरिक्त पाणी आता उजनी जलाशयात दाखल होत असल्याने जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन तो सध्या 70.43 टक्‍क्‍यांपर्यंत गेल्याने उजनी पाणलोट तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे. यापुढेही मोठा व दमदार पाऊस होवो व उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरो, अशी प्रार्थना शेतकरीवर्ग गणरायापुढे करीत आहेत.

हेही वाचा: चिंचगाव टेकडी येथील रामानंद सरस्वती महाराज यांचे देहावसान

श्री गणेशाच्या आगमनाबरोबरच पावसाचे देखील पुनरागम झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी, पुणे जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने त्याच्या बळावर निश्‍चितच उजनी धरण 100 टक्के भरेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत. सोलापूर, पुणे, नगर या तिन्ही जिल्ह्यांसह बार्शी, उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, करमाळा आदी मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना या उजनी जलाशयावरच अवलंबून असल्याने सर्वांच्या नजरा उजनी जलाशयाकडे लागल्या आहेत. दरवर्षी उजनी धरण 15 ऑगस्टच्या दरम्यान 100 टक्के क्षमतेने भरते; परंतु यावर्षी ऑगस्ट संपला तरी जलाशयाचा पाणीसाठा शतकापासून अद्यापही 32 पावले दूरच आहे.

हेही वाचा: वीर धरणातून नीरा नदीत 23 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

ठळक...

  • एकूण पाणी पातळी : 495.410 मीटर

  • एकूण पाणीसाठा : 101.38 टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा : 37.72 टीएमसी

  • टक्केवारी : 70.43 टक्के

उजनीमध्ये दाखल होणारा विसर्ग

  • दौंड : 14327 क्युसेक

  • बंदगार्डन : 20498 क्युसेक

loading image
go to top