महापालिकेचा करंटेपणा! प्राणी संग्रहालयासाठी हवा तीस हजारात संचालक
महापालिकेचा करंटेपणा! प्राणी संग्रहालयासाठी हवा तीस हजारात संचालकCanva

महापालिकेचा करंटेपणा! प्राणी संग्रहालयासाठी हवा तीस हजारात संचालक

महापालिकेचा करंटेपणा! प्राणी संग्रहालयासाठी हवा तीस हजारात संचालक
Summary

महापालिकेला अवघ्या तीस हजार एकत्रित मानधनात संचालक व वीस हजार रुपये मानधनात पशुवैद्यकीय अधिकारी हवा आहे.

सोलापूर : केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणकडून (Central Zoological Authority) येथील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची (Mahatma Gandhi Zoo, Solapur) दोन महिन्यांपूर्वी पाहणी झाली. त्यानंतर पुन्हा प्राणी संग्रहालय सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. महापालिकेने (Solapur Municipal Corporation) अनेकदा जाहिरात काढूनही प्राणी संग्रहालय संचालक व पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) मिळेनासा झाला आहे. महापालिकेला अवघ्या तीस हजार एकत्रित मानधनात संचालक व वीस हजार रुपये मानधनात पशुवैद्यकीय अधिकारी हवा आहे. विशेष म्हणजे दोन्ही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील पदवीधर व प्राणी संग्रहालयातील किमान पाच वर्षांच्या अनुभवाची अट आहे.

महापालिकेचा करंटेपणा! प्राणी संग्रहालयासाठी हवा तीस हजारात संचालक
प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे 'पेट'चा निकाल लांबला !

सध्याची महागाई विचारात घेता पदवीपर्यंतचे शिक्षण झालेला अनुभवी माणूस इतक्‍या कमी मानधनात मिळेल का? याचा व्यावहारिक दृष्टिकोनातून महापालिकेने विचार केला असेल असे दिसत नाही. यामुळे सोलापूर महानगरपालिकेला महात्मा गांधी प्राणी संग्रहालय अर्थात राणीचा बाग बंद अवस्थेत ठेवण्यातच आनंद वाटतो आहे असे दिसते. महापालिकेची इच्छाशक्ती पाहता या बागेला पुन्हा ऊर्जितावस्था आणून पर्यटक व समस्त सोलापूरवासीयांसाठी हे प्राणी संग्रहालय आता चालू होण्याची चिन्हे धूसर होत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने त्रुटी दुरुस्तीसाठी दिलेली संधी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे वाया गेली. सक्षम अधिकाऱ्यांअभावी बंद अवस्थेत असलेले प्राणी संग्रहालय "असून अडचण व नसून खोळंबा' झाले आहे. कामगारांचे वेतन व प्राण्यांच्या देखभालीसाठी लाखो रुपये महिना खर्च होत असताना मान्यता, सक्षम अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी प्राणी संग्रहालय लोकांना पाहता येत नाही. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने दाखवलेल्या त्रुटी अद्याप दूर झालेल्या नाहीत.

महापालिकेचा करंटेपणा! प्राणी संग्रहालयासाठी हवा तीस हजारात संचालक
प्रॉक्‍सिमिटी सेन्सर ! रेल्वे प्लॅटफॉर्मवर येताच ऑन होतात लाईट्‌स

गेल्या जवळपास दोन एक महिन्यांपासून पालिकेकडून प्राणी संग्रहालय संचालक पदासाठी जागा रिक्त असल्याने भरती प्रक्रियेची जाहिरात वारंवार दैनिकातून प्रसिद्ध करण्यात येत आहे. मात्र, या पदासाठी अत्यंत कमी मानधन व सहा महिन्यांचे कंत्राटी तत्त्वावरील पद असल्याने सक्षम अधिकारी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकदा जाहिराती आल्या तरी संचालक पदाची जागा मात्र रिक्तच आहे. आणि जोपर्यंत हे पद भरले जात नाही तोपर्यंत केंद्राकडून आपल्या सोलापूरकरांच्या हक्काच्या प्राणी संग्रहालयास हिरवा कंदिल मिळणे कठीणच आहे.

महापालिकेकडून हे पद भरताना काही नियम लागू करण्यात आले आहेत. उमेदवारास अवघे 30 हजार रुपये मासिक मानधन आणि तेही सहा महिन्यांचे कंत्राट तसेच पाच वर्षांचा इतर प्राणी संग्रहालयातील अनुभव, अशा अटींमुळे या पदावर काम करण्यास कोणी इच्छुक नाही. कारण, एवढा अनुभवी व शिक्षण झालेला अधिकारी अवघ्या तीस हजार मानधनात मिळणे कठीण आहे.

- इम्रान सगरी, पर्यावरणप्रेमी

सोलापुरातील राणीचा बाग चालू होणार- होणार म्हणता म्हणता चार- पाच वर्षे गेली आहेत. महापालिकेने विचारपूर्वक योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. लवकरात लवकर थेट दिल्ली गाठून हा प्राणी संग्रहालय चालू होण्यासाठी मान्यता मिळविणे आवश्‍यक आहे.

- पप्पू जमादार, पर्यावरणप्रेमी

मानधन कमी आहे हे मान्य आहे. ते वाढविण्यात येण्याबाबत मी आयुक्तांशी चर्चाही केली आहे. लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल.

- एन. के. पाटील, उपायुक्त, सोलापूर महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com