

Madha Revenue Department Under Scanner Over Three-Year Delay in Theft Case
sakal
उपळाई बुद्रूक : उपळाई बुद्रूक (ता. माढा) शिवारातील सरकारी जमिनीतून तब्बल १२ लाख ५९ हजार ७०० रुपयांचा मुरूम अवैधरीत्या उपसा केल्याप्रकरणी माढा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार २०२३ मध्ये घडला, त्यानंतर २०२५ मध्ये पंचनामा करण्यात आला आणि अखेर २०२६ मध्ये माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या विलंबामुळे महसूल प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.