
-महेश पाटील
सलगर बुद्रुक,(जिल्हा सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील सलगर बुद्रुक या गावच्या परिसरातील गावांमध्ये कृषी साहित्यांची चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या या गावांमध्ये कायद्याचा धाक नसल्याने चोरांचा सुळसुळाट सुरू आहे.सुगीचे दिवस असल्याने शेतकरी दिवसभर काबाड कष्ट करून झोपी गेला की मध्यरात्री नंतर चोरांचा बाजार सुरू होत आहे.