esakal | मध्यरात्री दीड वाजता घडलेला रुग्णालयातील प्रकार सीसीटीव्हीत
sakal

बोलून बातमी शोधा

Theft at three places in Mangalveda taluka

मध्यरात्रीच्या सुमारास या गावात कमरेला हत्यार असलेल्या चोरट्याने धुमाकूळ घातला. यामध्ये किराणा व्यवसाय असलेल्या सिद्धेश्वर चिनगे हे जेवण करुन कुटूंबासमवेत घराच्या वरच्या मजल्यावर झोपले असता खालच्या मजल्यावरील कपाटात ठेवलेले सोन्याचे गंठण,  लक्ष्मी हार, असा साडेसात तोळ्याचा ऐवज, राजकुमार चिनगे यांची होंडा शाईन कंपनीची नवीन दुचाकी, सोन्याचे दुकान सोन्याचे दुकान समजून शिवानंद पाटील यांचे घर फोडण्याचा प्रयत्न...

मध्यरात्री दीड वाजता घडलेला रुग्णालयातील प्रकार सीसीटीव्हीत

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे चार चोरट्यांनी महिलांच्या दागिण्यावर डल्ला मारला.  यात जवळपास साडे सात तोळे दागिने, रोख रक्कम व दुचाकी चोरून नेण्याचा प्रताप केला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे कैद झाले.
मध्यरात्रीच्या सुमारास या गावात कमरेला हत्यार असलेल्या चोरट्याने धुमाकूळ घातला. यामध्ये किराणा व्यवसाय असलेल्या सिद्धेश्वर चिनगे हे जेवण करुन कुटूंबासमवेत घराच्या वरच्या मजल्यावर झोपले असता खालच्या मजल्यावरील कपाटात ठेवलेले सोन्याचे गंठण,  लक्ष्मी हार, असा साडेसात तोळ्याचा ऐवज, राजकुमार चिनगे यांची होंडा शाईन कंपनीची नवीन दुचाकी, सोन्याचे दुकान सोन्याचे दुकान समजून शिवानंद पाटील यांचे घर फोडण्याचा प्रयत्न झाला.  परंतु तिथे त्यांच्या हाताला काहीच लागले नाही तर डॉ. विजयकुमार धायगुडे यांच्या शिवपार्वती हॉस्पिटलमध्ये चोरट्यांनी ड्रॉवरमधील रोख रक्कम व गोळ्याचे पाकीट नेले. दरम्यान दवाखान्यात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये तीन चोरट्यांनी दवाखान्यात प्रवेश केला व एक छोटा दरवाजा समोर देखरेखीसाठी थांबल्याचे दिसत आहेत. चोरट्याचे चेहरे स्पष्ट दिसत असल्यामुळे पोलिसांकडून चोरटे तात्काळ पकडले जावेत जेणेकरून चोरट्यानी घाततेली दशहत कमी होईल. सदरच्या चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यास ग्रामस्थ पोलिस स्टेशनकडे गेले असून सध्या सलगर बुद्रुकमध्ये ज्या ठिकाणी चोरी झाली आहे. ती घटना पाहण्यासाठी गावातील जमाव जमला असून चोरट्याचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

loading image