मिडकॅप शेअर्ससोबत पोर्टफोलिओ बनवा तगडा! तज्ज्ञांकडून 6 शेअर्सची लिस्ट

शेअर बाजारातील मिडकॅप देशांतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांचा लाडका आहे. याचे कारण म्हणजे यात गुंतवणुकीसाठी एकापेक्षा जास्त पर्याय आहेत.
shares
sharesesakal
Summary

शेअर बाजारातील मिडकॅप देशांतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांचा लाडका आहे. याचे कारण म्हणजे यात गुंतवणुकीसाठी एकापेक्षा जास्त पर्याय आहेत.

Best Midcap Stocks : मिडकॅप सेगमेंटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांचे फंडामेंटल्स खूप मजबूत आहेत. त्याच वेळी, या शेअर्सचे व्हॅल्युएशन अतिशय चांगले आहे. या शेअर्समधून गुंतवणूकदारांना शॉर्ट ते लाँग टर्ममध्ये चांगला परतावा मिळू शकतो. मिडकॅपमधील काही शेअर्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यात Aster DM Health, Alkyl Amines, Astrazeneca, Railtel India, Subex आणि Sundaram Fasteners यांचा समावेश आहे. शेअर बाजार तज्ज्ञ या शेअर्सबाबत काय सांगत आहेत ते पाहुयात.

- शेअर बाजार तज्ज्ञ जय ठक्कर...

लॉन्ग टर्म: Aster DM Health-

Aster DM Health मध्ये लाँग टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला जय ठक्कर यांनी दिला आहे. या स्टॉकसाठी 304 रुपये टारगेट ठेवण्यात आले आहे. हे शेअर्स येत्या काळात चांगला परतावा देतील असा विश्वास ठक्कर यांना आहे.

shares
100 रुपयांपेक्षा स्वस्त शेअर! येणाऱ्या काळात मजबूत परतावा देणार

पोझिशनल: अल्काइल अमाइन (Alkyl Amines)

जय ठक्कर यांनी पोझिशनल पिक म्हणून अल्काइल अमाइन्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 4000 रुपयांचे टारगेट ठेवण्यात आले आहे. तर 2900 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स फंडामेंटली मजबूत आहेत पण ते ओव्हरसोल्ड झालेत, यापुढे या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसेल असे ठक्कर सांगत आहेत.

शॉर्ट टर्म: Astrazeneca

Astrazeneca मध्ये शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला जय ठक्कर यांनी दिला. यासाठी 3700 रुपयांचे टारगेट ठेवण्यात आले आहे. तर 3000 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. जास्त ओव्हरसोल्ड झाल्यानंतर, आता शॉर्ट टर्ममध्ये या शेअरमध्ये तेजीची अपेक्षा असल्याचे ठक्कर म्हणाले.

shares
Tega Industriesचा आणखी एक IPO; जाणून घ्या एका शेअरची किंमत

शेअर बाजार तज्ज्ञ अंबरिश बलिगा

लॉन्ग टर्म: रेलटेल इंडिया (Railtel India)

अंबरिश बालिगा यांनी रेलटेल इंडियामध्ये (Railtel India) लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 190 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. टेलिकॉम हा रेल्वेचा कणा आहे. रेलटेल रेल्वे स्थानकांवर वाय-फाय पुरवते आणि प्रवाशांना माहिती पुरवते. कंपनीच्या उत्पन्नापैकी केवळ 30 टक्के महसूल रेल्वेकडून येतो, म्हणजेच तो केवळ रेल्वेवर अवलंबून नससल्याचे अंबरिश म्हणाले.

पोझिशनल: सुबेक्स (Subex)

अंबरीश बालिगांनी सुबेक्सला (Subex)पोझिशनल पिकसाठी निवडले आहे. या शेअरसाठी 74 रुपये टारगेट ठेवले आहे. ही एक कम्युनिकेशन्स प्रोवायडर कंपनी आहे. कंपनीचे जागतिक स्तरावर 200 दूरसंचार ग्राहक आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कंपनी कर्जमुक्त आहे.

shares
अबब! 'या' मल्टीबॅगर पेनी स्टॉकचा 3 महिन्यांत 1200 टक्के परतावा

शॉर्ट टर्म: सुंदरम फास्टनर्स (Sundaram Fasteners)

अंबरिश बालिगांनी सुंदरम फास्टनर्समध्ये शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 950 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची आर्थिक स्थिती चांगली राहिली आहे. चिपच्या कमतरतेची समस्या सुटल्याने आता कंपनीचा नफा वाढेल असा विश्वास बलिगा यांना आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com