esakal | अबब! 61 लाखांची ऑनलाइन फसवणूक ! डॉक्‍टर, शिक्षकांसह नोकदार आमिषाला बळी
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime

अबब! 61 लाखांची ऑनलाइन फसवणूक; शिक्षकांसह नोकदार आमिषाला बळी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

कोरोना काळात शहर- ग्रामीणमधील 128 जणांची तब्बल 61 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

सोलापूर : जॉबचा शोध, कमी पैसे गुंतवल्यास जास्त लाभ मिळतो, स्वस्तात आरोग्य विमा पॉलिसी (Health insurance policy), सीमकार्ड व्हेरिफिकेशन अशी विविध आमिषे दाखवून सायबरच्या माध्यमातून अनोळखी व्यक्‍तींकडून कॉल, मेसेजद्वारे फसवणूक केली जात आहे. कोरोना काळात शहर- ग्रामीणमधील 128 जणांची तब्बल 61 लाखांची फसवणूक (Online Fraud)) झाल्याचे समोर आले आहे. (There have been 61 lakh online fraud in the city and district-ssd73)

हेही वाचा: "एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

कॅशलेस इंडिया (Cashless India), डिजिटल इंडियामुळे (Digital India) बहुतेक लोक आता फोन पे (Phone Pay, गूगल पे (Google Pay), ऍमेझॉन (Amazon) अशा विविध माध्यमांतून ऑनलाइन व्यवहार करीत आहेत. ही संधी साधून सायबल क्रिमिनल्सकडून (Cyber criminals) तसे सावज शोधायला सुरवात झाली आहे. गूगलच्या माध्यमातून आपण वस्तू अथवा काहीतरी खरेदी करण्यासाठी क्रमांकाचा शोध घेतो. त्यानंतर काही वेळाने अथवा काही दिवसांनी अनोळखी व्यक्‍तीचा मोबाईलवर कॉल येतो. गूगलवर आपण सर्च केलेल्याचा संदर्भ देऊन आपला विश्‍वास संपादित करतो. त्यानंतर तो आमिष दाखवून आपली वैयक्‍तिक माहिती मिळवितो. आपण आपली संपूर्ण माहिती दिल्यानंतर काही वेळातच आपल्या बॅंक खात्यातून हजारो, लाखो रुपये ऑनलाइन लंपास होतात. विशेषत: झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल अशा ठिकाणी त्यांचे लोकेशन दाखवल जाते. ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर आपण सुशिक्षित असतानाही फसलो, लोक काय म्हणतील म्हणून अनेकजण तक्रार द्यायला पुढे येत नाहीत. तरीही, पोलिसांनी 14 ते 15 लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. त्यासाठी सायबर सेलची (Cyber cell) मोठी मदत झाली आहे.

हेही वाचा: शासकीय महापूजेवेळी "यांनाच' मंदिरात प्रवेश !

अनोळखी कॉल, मेसेजद्वारे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सुशिक्षित तरुण, नोकदारांसह ज्येष्ठ नागरिक, डॉक्‍टर (Doctor) त्याला बळी पडत आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्‍तीचा कॉल आणि मेसेज आल्यास आमिषाला बळी पडू नका. आपली वैयक्‍तिक व बॅंकेची माहिती देऊ नका.

- सूरज निंबाळकर, पोलिस निरीक्षक, सायबर सेल, सोलापूर ग्रामीण पोलिस

फसवणुकीची शहर-ग्रामीणमधील स्थिती

  • शहरातील तक्रारी : 74

  • फसवणुकीची अंदाजित रक्‍कम : 25.70 लाख

  • ग्रामीणमधील तक्रारी : 54

  • फसवणुकीची रक्‍कम : 35.53 लाख

  • महिला डॉक्‍टरही सायबरच्या जाळ्यात

समोरील अनोळखी व्यक्‍तीने शहरातील एका महिला डॉक्‍टरच्या मोबाईलवर फेक वेबसाईट तयार करून लिंक पाठविली. लिंक ओपन केल्यानंतर त्यात बॅंक डिटेल्स भरले. त्यानंतर समोरील व्यक्‍तीने दुसरी लिंक पाठविली. त्यात एक ऍप डाउनलोड करायला सांगितले. त्यांनी ते ऍप डाउनलोड करताच त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ऍक्‍सेस समोरील व्यक्‍तीच्या हातात गेला. त्याने लगेच त्या डॉक्‍टर महिलेच्या बॅंक खात्यातून काही रक्‍कम काढली. त्याचा मेसेज आल्यानंतर त्यांनी आईला तातडीने बॅंकेत जायला सांगितले. बॅंकेत जाऊन ते खाते तात्पुरते बंद केल्याने पुढील फसवणूक टळली, असाही अनुभव पोलिस निरीक्षक निंबाळकर यांनी सांगितला.

loading image