esakal | "एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा? कोरोनाची परिस्थिती पाहून 15 जूननंतर अंतिम निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

आयोगाने जिल्हानिहाय कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरवात केली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर आयोगाकडून परीक्षेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारणा केली जाईल.

"एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना "एमपीएससी'च्या (MPSC) संयुक्‍त पूर्व परीक्षेबाबत उत्सुकता लागली आहे. मात्र, राज्यातील 14 जिल्ह्यांमधील कोरोनाची (Covid-19) स्थिती अजूनही सुधारली नसल्याने ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तरीही, सध्याचा लॉकडाउन संपल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (Disaster Management Department) परवानगीने 18 जुलैला परीक्षा होऊ शकते, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. (The joint pre-examination of MPSC is likely to be held in September)

हेही वाचा: इंडियन आर्मीमध्ये नोकरीची संधी! महिला उमेदवारही करू शकतात अर्ज

जूननंतर राज्यात पावसाला सुरवात होते आणि जुलै-ऑगस्टमध्ये मुंबई, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे या काळात परीक्षा घेणे अशक्‍य आहे. तर ऑक्‍टोबरमध्ये यूपीएससीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे 18 जुलैपर्यंत परीक्षा न झाल्यास संयुक्‍त पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्येच होईल, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आता आयोगाने जिल्हानिहाय कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरवात केली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर आयोगाकडून परीक्षेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारणा केली जाईल. त्यानंतर परीक्षेसाठी पोषक वातावरण असल्यास जुलैच्या मध्यावधीत परीक्षा घेण्याचे नियोजन होईल. परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या एक महिना अगोदर जाहीर करावे लागते, असेही आयोगातील सूत्रांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा: तुळजापूरहून विवाहासाठी मुलगी निघाली सोलापूरकडे, आज विवाह होता, पण...

नियुक्‍त्यांबाबत आयोगाचे सरकारला पत्र

पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकाऱ्यांसह जवळपास दोन हजार उमेदवार एमपीएससीच्या सर्वच परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात गेल्याने त्या उमेदवारांच्या नियुक्‍त्या रखडल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होऊनही त्या उमेदवारांच्या नियुक्‍त्यांबाबत राज्य सरकारने तोंडावर बोट ठेवले आहे. उमेदवारांकडून आयोगाला दररोज नियुक्‍तीसंदर्भात विचारणा केली जात असल्याने त्यांच्याबाबतीत काय निर्णय घ्यायचा, याचे मार्गदर्शन करावे, असे पत्र आयोगाने सामान्य प्रशासन विभागाला पाठविले आहे. परंतु, अजून त्यावर निर्णय झाला नसल्याने आणखी काही दिवस त्या उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांबाबत काय निर्णय घ्यायचा, यासंदर्भात सरकारला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यावर अजून निर्णय झाला नाही. तर संयुक्‍त पूर्व परीक्षेचा निर्णय कोरोनाची परिस्थिती पाहून घेतला जाईल.

- स्वाती मसे-पाटील, सचिव, एमपीएससी आयोग

loading image
go to top