शहरासह चार तालुक्‍यात कोरोनाचा नवा रुग्ण नाहीच

अक्‍कलकोट, दक्षिण-उत्तरसह सांगोल्याला दिलासा
corona death
corona deathsakal media

सोलापूर : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरासह चार तालुक्‍यांना दिलासा मिळाला आहे. आज (बुधवारी) अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि सांगोला तालुक्‍यात कोरोनाचा नवा एकही रुग्ण आढळला नाही. शहरात नवीन रुग्ण आढळला नाही, परंतु एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीणमधील तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहरातील पाच लाख एक हजार 449 तर ग्रामीणमधील 27 लाख आठ हजार 867 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात शहरातील 29 हजार 394 तर ग्रामीणमधील एक लाख 74 हजार 136 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दु:खद बाब म्हणजे कोरोनामुळे शहर-ग्रामीणधील पाच हजार 72 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख 98 हजार 108 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. सध्या शहरातील 33 तर ग्रामीणमधील 317 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज बार्शी तालुक्‍यात दहा, मोहोळ, पंढरपूर व माढा तालुक्‍यात प्रत्येकी आठ रुग्ण वाढले आहेत. तसेच करमाळा तालुक्‍यात दोन, माळशिरस तालुक्‍यात पाच, मंगळवेढ्यात एक रुग्ण आढळला आहे. ग्रामीणमध्ये आज एकूण 42 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

साडेचार लाख जणांचे लसीकरण

शहरातील 18 वर्षांवरील सहा लाख 40 लाख 503 व्यक्‍तींचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. त्यापैकी चार लाख 53 हजार 14 व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी दोन लाख नऊ हजार 696 जणांनी दोन्ही डोस टोचून घेतला आहे. शहरातील आणखी एक लाख 87 हजार व्यक्‍तींनी अजूनपर्यंत एकही डोस घेतलेला नाही. त्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम घ्यावी लागणार आहे. लसीकरणासाठी केंद्रे वाढवावी लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com