esakal | निमगाव परिसरात युरियाची टंचाई! शेतकऱ्यांकडून संताप
sakal

बोलून बातमी शोधा

निमगाव परिसरात युरियाची टंचाई! शेतकऱ्यांकडून संताप

शेतकऱ्यांची धडपड चालू असताना युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.

निमगाव परिसरात युरियाची टंचाई! शेतकऱ्यांकडून संताप

sakal_logo
By
नितीन मगर

निमगाव (सोलापूर) : राज्यात मान्सून दाखल झाला असल्याने शेतकरी (Farmers) खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. निमगाव (ता.माळशिरस) परिसरात मका, ज्वारी या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. तसेच आडसाली ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू असताना युरिया खताच्या (urea fertilizer) तुटवड्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. (there is scarcity of urea fertilizer in nimgaon area)

हेही वाचा: निमगाव येथील कॅनाॅल दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांनी केले स्वखर्चाने सुरू

ऊस, मका, ज्वारी या पिकांना रासायनिक खाद्याचा योग्य प्रकारे डोस देण्यासाठी युरिया खताची आवश्यकता आहे. या पिकांना योग्यवेळी खते देण्यासाठी शेतकरी विक्रेत्यांकडे फिरत आहे. युरिया हवा असेल तर इतर विद्राव्य खतांची सक्ती केली जात आहे. केवळ युरिया हवा असेल तर विविध कारणे सांगितली जात आहेत. युरिया खत मिळवणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले असून दुकानदाराच्या हातापाया पडण्याची वेळ आली आहे. ठराविक कंपनीचे युरिया खत बाजारात उपलब्ध असून युरियाबरोबर इतर खत घेण्याची अट दुकानदारांकडून घातली जात आहे. त्यामुळे युरियासाठी शेतकरी नाईलाजाने ही लिंकिंगची सक्ती केलेले खत किंवा किटकनाशके घेत आहे.

हेही वाचा: निमगाव गांगर्डा, राक्षसवाडी बिनविरोध, दिघी, तिखीत एका जागेसाठी निवडणूक

प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामात खतांच्या किमती वाढल्या जातात. ऐन मोसमात युरीया खताचा डोस पिकांना मिळाला नाही तर पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, त्यामुळे कितीही पैसे घेऊन युरिया द्या, अशी मागणी शेतकरी कृषी दुकानदारांकडे करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आधिच आर्थिक अडचणीत सापडला आहे. चालूचा खरीप हंगाम हा एवढाच आशेचा किरण शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून युरिया खताच्या टंचाईबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. (there is scarcity of urea fertilizer in nimgaon area)