esakal | वेळापूर पारधी वस्तीत पोलिसांवर जीवघेणा हल्ला ! पीआयसह दोन पोलिस जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

वस्तीतील एका इसमाने श्री. खारतोडे यांच्या डोक्‍यावर लाकडाचा घाव घालून गंभीर जखमी केले. त्यांच्या सोबत असणारे पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके आणि पोलिस नाईक दीपक मेहकर हेही या हल्ल्यात जखमी झाले.

वेळापूर पारधी वस्तीत पोलिसांवर जीवघेणा हल्ला! पीआयसह दोन पोलिस जखमी

sakal_logo
By
अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : वेळापूर (ता. माळशिरस) येथे पारधी वस्तीतील दारू भट्टीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वस्तीतील नागरिकांनी अचानक केलेल्या हल्ल्यात वेळापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे (Police Inspector Bhagwan Khartode of Velapur Police Station) डोक्‍याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले, तर इतर दोन पोलिस जखमी झाले आहेत. ही खळबळजनक घटना (Crime) शुक्रवारी (ता. 28) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. (There was a fatal attack on the police in Velapur Pardhi area)

हेही वाचा: आज आढळली कोरानाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वांत कमी रुग्णसंख्या !

वेळापूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयाच्या बाजूला असलेल्या पारधी वस्तीतील दारू भट्टीवर धाड टाकण्यासाठी पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे आणि इतर सहा कर्मचारी गेले होते. या वेळी वस्तीतील एका इसमाने श्री. खारतोडे यांच्या डोक्‍यावर लाकडाचा घाव घालून गंभीर जखमी केले. त्यांच्या सोबत असणारे पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके आणि पोलिस नाईक दीपक मेहकर हेही या हल्ल्यात जखमी झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी पोलिस कर्मचाऱ्याने दिली.

हेही वाचा: लवंगीतील गतिमंद बालगृहातील 41 मुले कोरोना पोझिटिव्ह !

पोलिस निरीक्षक खारतोडे यांच्या डोक्‍याला मार लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यांच्यासह जखमी पोलिसांना तातडीने वेळापूर येथील माने देशमुख हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच अकलूज पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांनी तातडीने रुग्णालयामध्ये धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांकडून घटनेबाबत माहिती घेऊन कर्मचाऱ्यांना तातडीच्या सूचना करून तपासाची सूत्रे हाती घेतली. रात्री उशिरा श्री. खारतोडे यांना पुढील उपचारासाठी अकलूजमधील खासगी रुग्णालयात हलवले आहे.

loading image