कोरोना, ओमिक्रॉनपासून सुरक्षित रहायचं का? तर मग 'हे' कराच

शारीरिक रोगप्रतिकारक शक्‍तीसोबतच मानसिक सदृढता असल्यास कोणत्याही आजाराविरुध्दची लढाई आपण यशस्वीपणे जिंकू शकतो.
 Corona
Coronaesakal
Updated on: 
Summary

शारीरिक रोगप्रतिकारक शक्‍तीसोबतच मानसिक सदृढता असल्यास कोणत्याही आजाराविरुध्दची लढाई आपण यशस्वीपणे जिंकू शकतो.

सोलापूर : कोरोनाच्या (Corona) महामारीत सर्रास कुटुंबातील किमान एकतरी व्यक्‍ती (Person) बाधित झाला आहे तर अनेक कुटुंबातील व्यक्‍तींचा मृत्यूही झाला आहे. मात्र, शारीरिक रोगप्रतिकारक शक्‍तीसोबतच (Immunity system) मानसिक सदृढता असल्यास कोणत्याही आजाराविरुध्दची लढाई आपण यशस्वीपणे जिंकू शकतो. सकाळी लवकर उठून प्राणायाम करणे, फिरणे, आहारात दूध, फळे, ताज्या भाज्यांचा वापर केल्यास निश्‍चितपणे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत, लक्षणे असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळेत उपचार घ्यावेत. सोशल डिस्टन्सिंग (Social distance), मास्क(Mask),सॅनिटायझरचा (Sanitizer)वापर नियमित करावा, जेणेकरून कोरोना (Corona) असो वा ओमिक्रॉन (Omicron) यापासून बचाव होऊ शकतो.

 Corona
ड्रायफ्रुट्स ठेवतील तुम्हाला Omicron पासून सुरक्षित

पोलिस खात्यात काम करताना लोकांच्या सेवेनिमित्त डॉ. कडूकर या सातत्याने घराबाहेर असतात. त्यांच्या कुटुंबात दहा वर्षांचा मुलगा अभिर आणि डॉ. कडूकर यांचे वडील ईश्‍वर कडूकर, सासरे हेमंतराव पाटील, सासू मंगल पाटील असे सर्वजण एकत्र राहतात. कोरोनाच्या दोन लाटा संपून आता तिसऱ्या लाटेला सुरवात झाली. डॉ. कडूकर यांचे सासरे हेमंतराव यांचे (वय 71) वर्षे तर सासू मंगल यांचे (वय 66) आहे. त्यांच्या व्यायाम, आहार, विहाराच्या जुन्या सवयींमुळे त्यांची प्रकृती अजूनही ठणठणीत आहे. तरीही, त्यांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेतली, हे विशेष. दुसरीकडे कोरोनाच्या दोन्ही लाटेत काहीही न झालेल्या अनेकांनी गैरसमजुतीतून प्रतिबंधित लस टोचून घेतलेली नाही. घरातील काहीजणांना कोरोनाची बाधा होऊनही त्या ज्येष्ठांनी घेतलेल्या खबरदारीमुळे त्यांच्यापर्यंत कोरोना पोहचलाच नाही. प्रत्येकांनी अशा पध्दतीने खबरदारी, काळजी घेतल्यास निश्‍चितपणे कोरोनाचे संकट हद्दपार होऊ शकते, सर्वजण निरोगी राहू शकतो, हे त्या ज्येष्ठांनी दाखवून दिले आहे. पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांचे वडील ईश्‍वर कडूकर यांचे (वय 89) वर्षे असतानाही त्यांनी त्यांची दररोजची सवय सोडली नाही. त्यामुळेच या वयातही ते ठणठणीत आहेत.

 Corona
ओमिक्रॉनचं नवं लक्षण जे फक्त रात्री दिसतं; कोणीच सुरक्षित नाही

कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांचा घाबरून मृत्यू झाला. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मन खंबीर, मनाची सदृढता असायला हवी. नियमित व्यायाम, वेळेवर जेवण, पुरेशी झोप घेतल्यास निश्‍चितपणे निरोगी राहायला मदत होते.

- डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपायुक्‍त, सोलापूर

निरोगी राहण्यासाठी...

- सायकलिंग, प्राणायाम, योगा, पायी चालण्याची हवी सवय

- कोरोनावरील प्रतिबंधित लस सर्वांनी घ्यावी; लस टोचल्यावरही कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत

- बैठे कामाला आवर घालावा; बाहेर फिरताना मास्क गरजेचाच, गर्दीत जाणे टाळा

- ताणतणाव घेऊ नये, लक्षणे असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार घ्यावेत

- रोगप्रतिकारक शक्‍ती वाढेल, असे पौष्टिक पदार्थ जेवणात असू द्या (अंडी, मटन, उसळ, डाळी, दूध, हिरव्या पालेभाज्या, फळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Drought Relief 2026 Farmers May Get Compensation Before Diwali Check Required Documents and Application Details
Shardiya Navratri Begins in Maharashtra with Ghatasthapana at Tuljapur Mahur Kolhapur and Saptashrungi Temple
Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
Marathi News Esakal
www.esakal.com