कमाई गेली म्हणून ते ट्रकच्या मागे धावत सुटले....

truck.jpg
truck.jpg
Updated on

कोरवली (सोलापूर) : पायी चालणाऱ्या परप्रांतीयांना तो ट्रकमध्ये घेऊन निघाला होता. ढाब्यावर सर्वजण आंघोळ करण्यासाठी उतरले अन्‌ चालकाने ट्रक चालू करून पळवण्यास सुरुवात केली. अख्खी कमाईची प्रवास भाड्याची रक्कम गेली म्हणून परप्रांतीय कामगार ट्रकच्या मागे धावत सुटले. हे सारे नाट्य कंदलगाव (सोलापूर) येथील ढाब्यावर घडले. 

कोरोना पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीने परप्रांतीय आणि राज्यातील मजुरांसह अनेकजण दोन महिने अडकले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानंतर अशा कामगारांना प्रवासाला परवानगी देण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात असले तरी अनेक परप्रांतीयांची पायपीट सुरूच आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश येथील आठ तरुण बंगळुरू येथील डोमिनो पिझ्झा या कंपनीत कामाला होते. 

हे तरुण बंगळुरू येथून पायी उत्तर प्रदेशकडे आपल्या गावाला निघाले असता त्यांना बंगळुरूपासून 50 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक ट्रक (एचआर 38 टी 9787 ) दिसला. ट्रकचालकाने त्यांच्याकडून 30 हजार रुपये घेऊन झाशीपर्यंत सोडण्याचे ठरले. नंतर हा ट्रक दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कंदलगाव येथील एका ढाब्यासमोर थांबला. स्नान करून चहा पिण्यासाठी हे प्रवासी तेथे उतरले. 
या संधीचा फायदा घेत ड्रायव्हरने ट्रक चालू करून पलायन करण्यास सुरवात केली. हा प्रकार लक्षात येताच जवळची अख्खी कमाई चालकाच्या स्वाधीन केलेले तरुण ट्रकच्या पाठीमागे पळू लागले. पण ट्रकचालक थांबण्यास तयार नव्हता. चालकाजवळ 30 हजार रुपये अडकल्याने आता जेवण तर सोडाच पण नाश्‍ता करण्यासाठी देखील पैसे उरले नव्हते. 
हा प्रकार कंदलगावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल उडाणशिवे यांना समजल्यानंतर त्यांनी मंद्रूप पोलिस स्टेशनशी संपर्क साधून माहिती दिली. दरम्यान, मंद्रूप पोलिस स्टेशनचे हवालदार एस. एस. कांबळे व कॉन्स्टेबल एस. एस. स्वामी घटनास्थळी पोचले. त्यांनी कामती पोलिसांशी संपर्क साधून ट्रक पकडण्यास सांगितले. कामती पोलिसांनी ट्रक पकडून मंद्रूप पोलिसांच्या ताब्यात दिला. हवालदार कांबळे आणि कॉन्स्टेबल स्वामी यांनी मजुरांनी चालकाला दिलेले 30 हजार रुपये घेऊन परत मजुरांच्या हातात दिले. एवढेच नव्हे तर काही तासांपासून अक्षरशः डोळ्यात पाणी आलेल्या त्या तरुणांना दिलासा देत पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वतःकडील जेवणाचे डबे देत त्यांची दुसऱ्या गाडीत जाण्याची सोय केली. पोलिसांच्या या मदतीने या परप्रांतीय मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com