काय म्हणावं या चोराला, ट्रान्स्फॉर्मरमधील ऑईल चोरून झाला पसार ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

transfarmer

मसरे मळा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ट्रान्स्फॉर्मरमधील ऑईल चोरट्याने लंपास केले आहे. चोरी झालेल्या ऑईलची किंमत अंदाजित 15 हजार 200 रुपयांपर्यंत होती, अशी फिर्याद गणपत विष्णू कांबळे (रा. राजेश अपार्टमेंट, दमाणी नगर) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली आहे. 

काय म्हणावं या चोराला, ट्रान्स्फॉर्मरमधील ऑईल चोरून झाला पसार !

सोलापूर : मसरे मळा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ट्रान्स्फॉर्मरमधील ऑईल चोरट्याने लंपास केले आहे. चोरी झालेल्या ऑईलची किंमत अंदाजित 15 हजार 200 रुपयांपर्यंत होती, अशी फिर्याद गणपत विष्णू कांबळे (रा. राजेश अपार्टमेंट, दमाणी नगर) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली आहे. ऑईल काढून नेल्याने त्या ठिकाणचा ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस नाईक श्री. कांबळे पुढील तपास करीत आहेत. 

म्हशी रस्त्यात आल्याने मारहाण 
जुना कारंबा नाका येथील आकाश प्रकाश कुचेकर हे दुचाकीवरून मार्केटला निघाले होते. त्या वेळी दुचाकीसमोर म्हशी आडव्या आल्याने कुचेकर यांनी राखणकर्त्याला त्याबाबत विचारणा केली. त्या वेळी सातजणांनी कुचेकर यांना मारहाण केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिसांत दाखल झाली आहे. त्यानुसार अप्पा नारायण माने, नितीन माने, सागर माने, श्रीकांत ऊर्फ पांडू माने, छाया माने, मंगल माने, मीनाक्षी माने (सर्वजण रा. प्रभाकर महाराज मंदिराशेजारी, सम्राट चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर छाया अप्पा माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश कुचेकर, भैरवनाथ ऊर्फ अजय शितोळे, नागेश कांबळे, दीपक गायकवाड, रवी बनसोडे, राहुल बागले, तोरणाबाई बागले व वैशाली माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

बेशिस्त वाहनचालकांकडून साडेबारा लाखांचा दंड वसूल 
शहरात विना मास्क, वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. 17 ऑगस्टपासून सातत्याने कारवाईची मोहीम शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत सुरू आहे. आतापर्यंत 12 हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल साडेबारा लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्‍तालयाकडून देण्यात आली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top