esakal | दारूचा विरह सहन नाही झाला, खिडकीतून तो बंद रेस्टॉरंटमध्ये शिरला अन्‌ त्याने...

बोलून बातमी शोधा

0Thief_20only_20lifted_20liquor_20ignored_20the_20money.jpg

30 तारखेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असून पुढील परिस्थिती पाहून शिथिलतेचा निर्णय होणार आहे. त्यामुळे सोलापुरातील एका रेस्टॉरंटमध्ये घुसून चोरट्याने पाच हजार 100 रूपयांची दारू पळवून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी (ता. 7) सकाळी दहा या वेळेत घडली आहे.

दारूचा विरह सहन नाही झाला, खिडकीतून तो बंद रेस्टॉरंटमध्ये शिरला अन्‌ त्याने...
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात तर शहरात महापालिका आयुक्‍तांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याअंतर्गत मद्यविक्री पूर्णपणे बंद असून रेस्टॉरंटदेखील बंद करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुटखा, तंबाखू, सुपारीसह तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची गोची होऊ लागली. 30 तारखेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असून पुढील परिस्थिती पाहून शिथिलतेचा निर्णय होणार आहे. त्यामुळे सोलापुरातील एका रेस्टॉरंटमध्ये घुसून चोरट्याने पाच हजार 100 रूपयांची दारू पळवून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी (ता. 7) सकाळी दहा या वेळेत घडली आहे.

वाहनातील बॅटरीची चोरी
सोलापूर : मार्केट यार्ड परिसरातून एका ऑटोरिक्षातून चोरट्याने तीन हजार रूपयांची बॅटरी चोरून नेली आहे. ही घटना सोमवारी रात्रीनंतर घडली असून या प्रकरणी रोहित नरेशकुमार वेद (रा. श्री शांती कुंज, झंवर मळा, सम्राट चौक) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली. गाडीच्या उजव्या बाजूच्या दरवाजाची काच उचकटून चोरट्याने बॅटरी पळविल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस नाईक श्री. शेख तपास करीत आहेत. 


होटगी रोडवर पुष्कर बार ऍण्ड रेस्टॉरंट आहे. निर्बंधामुळे ते दोन दिवसांपासून बंदच आहे. चोरट्याने ही संधी साधली आणि मंगळवारच्या मध्यरात्री तो चक्‍क खिडकीतून रेस्टॉरंटमध्ये घुसला. त्यानंतर त्याने रेस्टॉरंटमधील पाच हजार 100 रुपयांची दारू चोरली. तसेच हॉटेलमधील साडेचार हजार रुपये, पाच हजारांचा संगणक चोरून नेला. या प्रकरणी दीपक रामचंद्र मोरे (रा. विजयनगर, नई जिंदगी रोड) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. चोरट्याने रेस्टॉरंटचा मागील दरवाजा उचकटला. त्यानंतर वॉल कंपाउंडवर चढून खिडकीतून आत प्रवेश केला, असेही मोरे यांनी पोलिसांना सांगितले. त्या चोरट्याचा शोध पोलिस हवालदार श्री. घुगे हे घेत आहेत. 

वारस हक्क डावलला;
मेकालेसह चारजणांविरुध्द गुन्हा
सोलापूर : भाऊ, बहिण व सावत्र भाऊ अरूण भोसले हे कायदेशीर वारस असतानाही भरत मेकालेसह अन्य तिघांनी मालमत्तेचे कुलमुखत्यारपत्र तयार करून खरेदीखत तयार करून तशा नोंदी बेकायदेशीरपणे केल्याची फिर्याद नितीन गंगाराम भोसले (रा. रमजान भटीयार चाळ, डॉ. आंबेडकर चौक, कुर्ला पश्‍चिम, मुंबई) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. त्यानुसार भरत मेकाले, चंद्रकांत उर्फ व्यंकटेश किसन मेकाले (रा. जुनी लक्ष्मी चाळ, डोणगाव रोड) आणि मोहन सोपान भोसले (रा. डाळज नं-एक, इंदापूर), केदारनाथ नागनाथ स्वामी (रा. देगाव, उत्तर सोलापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

किरकोळ कारणातून मारहाण
सोलापूर : शिव्या का देतो म्हणून जाब विचारायला गेल्यानंतर आगतराव बजरंग ताड उर्फ भावड्याने विशालच्या डोक्‍यात फरशी घातली. तर शिवीगाळ करीत तुझा पाय मोडतो म्हणून धमकी दिली. शांता बजरंग ताड हा विशालच्या अंगावर धावून आला तर सागर बजरंग ताड याने शिवीगाळ केली, अशी फिर्याद सागर पांडूरंग गोसावी (रा. क्रांतीनगर, निराळे वस्ती) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक श्री. भोसले तपास करीत आहेत.