एकीकडे कोरोनाचा हल्ला तर दुसरीकडे चोरट्यांचा "इतक्‍या' किलो चांदीवर डल्ला! "या' ग्रामस्थांमध्ये उडाली खळबळ

Thief
Thief
Updated on

भोसे (सोलापूर) : कोरोना संकटाची भीती नागरिकांच्या मनात कायम असतानाच, काल (गुरुवारी) सायंकाळी पाचनंतर ते आज (शुक्रवारी) पहाटे साडेचारच्या दरम्यान मंगळवेढा तालुक्‍यातील भोसे येथील सोन्या-चांदीच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी पाच किलो चांदीचा (एकूण किंमत दोन लाख 34 हजार 950 रुपये) ऐवज घेऊन पोबारा केला. या प्रकरणाने दक्षिण भागातील बाजारपेठेच्या दृष्टीने मध्यवर्ती असलेल्या भोसे परिसरात खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी दुकानाचे मालक संतोष कौडूभैरी (वय 35) यांनी फिर्याद दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांनी चांदीच्या विविध नमुन्यातील पाच हजार 127 ग्रॅम चांदी व सीसीटीव्ही कॅमेरे असा ऐवज चोरून नेला. या चोरी दरम्यान शेजारी असलेल्या सिद्धनाथ ज्वेलर्स या दुकानातही चोरीचा प्रयत्न केला. तसेच या चौकातील डॉ. एस. पी. गुडगुटी यांच्या दवाखान्याचा पाठीमागील दरवाजा उचकटून साहित्याची उलथापालथ केली; परंतु चोरट्यांना काहीच हाती लागले नाही. 

या घटनेची माहिती समजताच मंगळवेढ्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी तत्काळ भोसे येथे येऊन घटनास्थळाला भेट देऊन चोरी झालेल्या शेजारील कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आठ चोरटे तोंडाला मास्क बांधून आल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील ग्रामस्थ व व्यापारी हैराण झाले असताना, भोसे येथील भर बाजारपेठेत हा चोरीचा प्रकार घडल्याने ग्रामस्थ व व्यापारी भयभीत झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन खटके करीत आहे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur
One-Sided Obsession Ends in Murder; Family Loses Its Sole Breadwinner
Solapur
Dr. Shirish Valsangkar family's
Marathi News Esakal
www.esakal.com