esakal | दरोडेखोरांनी प्लॅनिंगने तोडली सिग्नलची वायर अन्‌ टाकला यशवंतपूर-अहमदाबाद एक्‍स्प्रेसवर दरोडा !

बोलून बातमी शोधा

Trai_Robbery

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. 1) पहाटेच्या सुमारास यशवंतपूर-अहमदाबाद एक्‍स्प्रेसवर दरोडा पडला. हा दरोडा अक्कलकोट तालुक्‍यातील बोरोटी-नागणसूर स्थानकादरम्यान पडला. गाडी बोरोटी - नागणसूर परिसरात आली असता, दरोडेखोरांनी सिग्नलची वायर तोडून सिग्नल यंत्रणा बंद पाडली. त्यामुळे रेल्वे थांबली. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला कार्यभाग साधला. 

दरोडेखोरांनी प्लॅनिंगने तोडली सिग्नलची वायर अन्‌ टाकला यशवंतपूर-अहमदाबाद एक्‍स्प्रेसवर दरोडा !
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. 1) पहाटेच्या सुमारास यशवंतपूर-अहमदाबाद एक्‍स्प्रेसवर दरोडा पडला. हा दरोडा अक्कलकोट तालुक्‍यातील बोरोटी-नागणसूर स्थानकादरम्यान पडला. गाडी बोरोटी - नागणसूर परिसरात आली असता, दरोडेखोरांनी सिग्नलची वायर तोडून सिग्नल यंत्रणा बंद पाडली. त्यामुळे रेल्वे थांबली. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला कार्यभाग साधला. रेल्वेच्या सिग्नलची वायर तोडून गाडी थांबवत हा दरोडा टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

सोमवारी पहाटे अक्कलकोट तालुक्‍यातील बोरोटी-नागणसूर स्थानकादरम्यान आली. सिग्नल लागल्याने अचानक रेल्वे थांबली. प्रवाशांना काही कळायच्या आतच अचानक गाडीवर दगडफेक सुरू झाली. काही दरोडेखोरोंनी रेल्वेत प्रवेश करून महिलांच्या गळ्यातील सोने-चांदीचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत काही प्रवासी जखमीही झाले. दरोडेखोरांनी भिरकावलेल्या दगडांमुळेही काही प्रवासी जखमी झाले. प्रवाशांना मारहाण करत त्यांच्या जवळील दागिन्यांसह पैसे, मोबाईल, घड्याळ असा जवळपास तीन लाख 45 हजारांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. जवळपास 50 तोळे सोने दरोडेखोरांनी लुटल्याचा दावा एका महिला प्रवाशाने केला आहे. या घटनेमुळे तब्बल चार यशवंतपूर-अहमदाबाद एक्‍सप्रेस सोलापूर रेल्वे विभागात थांबवण्यात आली होती. 

या प्रकरणी सोनाली प्रफुल्ल सुरपुरिया (रा. नगर) यांनी सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर या घटनेत कविता बसनेट (वय 45), खेमा राम (वय 65), गजेंद्र सोनार (वय 52) हे तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता नेरकर व अमोल गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली.