तीन भाषांमध्ये लिहिता येणार पीएचडीचे पेपर! 17, 18 ऑगस्टला 'पेट' परीक्षा

तीन भाषांमध्ये लिहिता येणार "पीएचडी'चे पेपर ! 17, 18 ऑगस्टला "पेट' परीक्षा
तीन भाषांमध्ये लिहिता येणार पीएचडीचे पेपर
तीन भाषांमध्ये लिहिता येणार पीएचडीचे पेपरCanva
Updated on
Summary

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत विविध अभ्यासक्रमांतून पीएचडी करण्यासाठी यंदा तब्बल 650 जागांवर उमेदवारांना संधी मिळणार आहे.

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) विविध अभ्यासक्रमांतून पीएचडी (PhD) करण्यासाठी यंदा तब्बल 650 जागांवर उमेदवारांना संधी मिळणार आहे. "पीएचडी'च्या विद्यार्थ्यांची प्रश्‍नपत्रिका इंग्रजी व मराठीतून असणार आहे. परंतु, उमेदवारांना मराठी, इंग्रजी व हिंदीतून परीक्षा देता येणार आहे. विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने तसा निर्णय घेतला आहे.

तीन भाषांमध्ये लिहिता येणार पीएचडीचे पेपर
जिल्ह्यातील 'या' पाच तालुक्‍यांमध्ये कडक लॉकडाउन? शुक्रवारी निर्णय

कोरोनामुळे (Covid-19) यंदाची पेट परीक्षा ऑनलाइन होणार आहे. या परीक्षेची उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. पीएचडीसाठी एकूण चार थेअरी पेपर द्यावे लागतात. त्यातील दोन पेपर सर्वांसाठी सारखेच असतात तर दोन पेपर त्या-त्या विषयांसंबंधी असतात. नव्याने पीएचडीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे "कोर्स वर्क' घेतले जाणार आहे. त्यामध्ये पीएचडीसाठी विषय कसा निवडावा, त्या संबंधीची कागदपत्रे कशी संकलित करावीत, पेपर कसे असतात, यासह विविध मुद्‌द्‌यांवर एकत्रितपणे सर्वांनाच मार्गदर्शन केले जाणार आहे. ही संपूर्ण माहिती ऑनलाइन देणे अशक्‍य असल्याने कोरोनाची परिस्थिती पाहून विद्यापीठात त्यांना ऑफलाइन मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विकास कदम यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

विद्यापीठाचे नियोजित वेळापत्रक

  • "पीएचडी'साठी अर्ज करण्याची मुदत 10 ऑगस्ट

  • 17 व 18 ऑगस्ट रोजी होणार ऑनलाइन "पेट' परीक्षा

  • उमेदवारांना दिली जाणार "पेट'ची 20 ऑगस्टला उत्तरपत्रिका

  • 24 ऑगस्ट रोजी जाहीर होणार "पेट' परीक्षेचा निकाल

  • 6 सप्टेंबरनंतर सुरू होईल "पीएचडी'ची प्रवेश प्रक्रिया

तीन भाषांमध्ये लिहिता येणार पीएचडीचे पेपर
मित्राकडून 19 कोटींची फसवणूक ! बनावट स्वाक्षरीने विकले फ्लॅट

"पेट'साठी 100 टक्‍के प्रॉक्‍टरिंग

"पीएचडी'च्या 650 जागांसाठी आतापर्यंत एक हजार 600 इच्छुकांनी विद्यापीठाकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आणखी सहा दिवस आहे. त्यामुळे अंदाजित चारशे ते पाचशे अर्ज वाढण्याची शक्‍यता आहे. पीएचडी परीक्षेपूर्वी इच्छुक उमदेवारांची पेट परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून विद्यापीठाकडून प्रॉक्‍टरिंग प्रणालीचा (विद्यार्थ्यांची हालचाल व लोकेशन टिपणारे तंत्रज्ञान) वापर केला जाणार आहे. प्रत्येक उमेदवारावर या प्रणालीतून वॉच ठेवला जाणार आहे.

पीएचडीची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. तत्पूर्वी, विविध अभ्यासक्रमांसाठी उमेदवार निवडण्यासाठी "पेट' परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून प्रॉक्‍टरिंगचा वापर केला जाणार आहे.

- डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why was Vande Bharat delayed in Pune?
Solapur Tour May Decide Fate of Long-Pending Rail Project
Political Heat Rises in Solapur; Decision on MLC Candidate Likely Soon
drug
Marathi News Esakal
www.esakal.com