यंदा नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाहाचे 63 मुहूर्त

विवाहेच्छुकांसाठी खूषखबर! यंदा नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाहाचे 63 मुहूर्त
यंदा नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाहाचे 63 मुहूर्त
यंदा नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाहाचे 63 मुहूर्त sakal
Summary

अनेकांना धूमधडाक्‍यात लग्न सोहळे करून आपल्या घरच्या लक्ष्मीचे स्वागत करण्याचे वेध लागले आहेत. यंदा नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाहाच्या तारखा आहेत.

केत्तूर (सोलापूर) : कोरोना (Covid-19) संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून लग्न (Marriage) समारंभांना ब्रेक लागला होता. या काळातही काही अपवादात्मक विवाह नियम, अटी व शर्थी पळून पार पडले. अनेकांनी घरगुती कार्यक्रमांत आपल्या मुला-मुलींचे विवाह उरकून घेतले. मात्र, आता कोरोनाचे नियम शिथिल झाले असून अनेकांना धूमधडाक्‍यात लग्न सोहळे करून आपल्या घरच्या लक्ष्मीचे स्वागत करण्याचे वेध लागले आहेत. यंदा नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाहाच्या तारखा आहेत.

गेल्या दीड वर्षात इच्छा असूनही अनेकांचे विवाह कोरोनाच्या कात्रीत अडकले होते. अनेक सासू-सासऱ्यांचे घरी सूनबाईंना घेऊन येण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. भावी नववधू-वरांना आपल्या विवाहाची काळजी लागली होती. याच काळात विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेले अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे यावर अवलंबून असलेले अनेक व्यावसायिक, कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आता मात्र काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनानेही नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे आता अनेकांचा लग्नाचा बार धूमधडाक्‍यात उडणार आहे.

यंदा नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाहाचे 63 मुहूर्त
'उजनी'त प्रथमच सापडला परदेशी 'चंदा'! वाढतेय जैवविविधता

यावर्षी लग्नाचे 63 मुहूर्त असून, तुळशी विवाहानंतर मुहूर्ताचा धूमधडाका सुरू होणार आहे. 20 नोव्हेंबरपासून ते जुलै 2022 पर्यंत यंदा विवाह सोहळे चालणार आहेत. त्यासाठी सोयरीक जुळवण्यासाठी नातेवाइकांकडे गळ घातली जात आहे. आमच्या मुलीला, मुलाला स्थळ काढा, असे निरोप नातेवाइकांना धाडले जात आहेत. यंदा नोव्हेंबर 2021 व मार्च 2022 मध्ये फक्त चार-चार तर डिसेंबर 2021 मध्ये सर्वाधिक 11 लग्न मुहूर्त आहेत.

व्यावसायिक आनंदात

यंदा लग्नसमारंभ धूमधडाक्‍यात होणार असल्याने यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिक व कामगारांना चांगले दिवस येणार आहेत. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेले मंगल कार्यालय, आचारी, पुजारी, फुलवाले, वाजंत्री, घोडेवाले, मंडपवाले, बॅंडवाले, केटरर्स, डेकोरेटर्स, डॉल्बी, लग्नपत्रिका छपाई आदींसह सर्व व्यावसायिकही आनंदात आहेत.

यंदा नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाहाचे 63 मुहूर्त
जिल्ह्यात वाढणार 35 नगरसेवक! जुन्या दहा नगरपरिषदांचा समावेश

लग्नाचे मुहूर्त...

  • नोव्हेंबर 2021 : 20, 21, 29, 30

  • डिसेंबर 2021 : 1, 7, 8, 9, 13, 19, 24, 26, 27, 28, 29, 31

  • जानेवारी 2022 : 20, 22, 23, 27, 29

  • फेब्रुवारी 2022 : 5, 6, 7, 10, 17, 19

  • मार्च 2022 : 25, 26, 27, 28

  • एप्रिल 2022 : 15, 17, 19, 21, 24, 25

  • मे 2022 : 4, 10, 13, 14, 18, 20, 21, 26

  • जून 2022 : 1, 6, 8, 11, 13, 14, 15, 16, 18, 22

  • जुलै 2022 : 3, 5, 6, 7, 8, 9

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com