'उजनी'त प्रथमच सापडला परदेशी 'चंदा'! वाढतेय जैवविविधता

'उजनी'त प्रथमच सापडला परदेशी 'चंदा'! वाढतेय जैवविविधता
'उजनी'त प्रथमच सापडला परदेशी 'चंदा'! वाढतेय जैवविविधता
'उजनी'त प्रथमच सापडला परदेशी 'चंदा'! वाढतेय जैवविविधताSakal
Summary

या माशाचे मूळ स्थान जपान, न्यू गिनी, दक्षिण ऑस्ट्रलिया या भागातील चिखलयुक्त सागरी तीरावर व खाडी प्रदेशातील आहे.

केत्तूर (सोलापूर) : करमाळा (Karamala) तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील उजनी (Ujani Dam) पाणलोट क्षेत्राच्या फुगवट्याच्या पाण्यात मच्छिमारांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये अंदाजे अर्धा किलो वजनाचा एक आगळावेगळा परदेशी मासा मच्छिमारांना सापडला आहे. स्थानिक मच्छिमार या माशाला चंदा या नावाने ओळखतात. तर परदेशात स्कॅतोफेगस/ बटरफिश / कॉमन स्कॅट / टायगर स्कॅट या नावाने याला ओळखले जाते. जलाशयाच्या गोड्या पाण्यात नेहमी सापडणाऱ्या माशांपेक्षा हा वेगळ्या प्रकारचा मासा असल्याने या माशाविषयी औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.

उजनी फुगवट्यावरील केत्तूर - पोमलवाडी येथे नव्याने बांधलेल्या पुलाजवळील जलाशयाच्या अथांग पाण्यामध्ये सौरभ कनिचे व रोहन भोई या मच्छिमारांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये इतर माशांबरोबर हा आगळावेगळा मासा सापडला. त्यांनी तो जाळीबाहेर काढून "सकाळ'चे प्रतिनिधी राजाराम माने यांच्याशी संपर्क साधला व सदर माशाची माहिती दिली. माने यांनी प्राणिशास्त्र व पर्यावरणप्रेमी डॉ. अरविंद कुंभार यांना त्याचे छायाचित्र पाठविल्यानंतर कुंभार यांनी या आगळ्यावेगळ्या माशाविषयी पुढीलप्रमाणे माहिती दिली.

  • स्थानिक मराठीत चंदा मासा या नावाने ओळखतात

  • बटर फिश, ग्रीन स्कॅट व कॉमन स्कॅट व टायगर स्कॅट हे त्याची इतर सामान्य नावे

  • हिरव्या व तांबड्या रंगाच्या दोन प्रजाती यात आढळतात

  • या माशाचे मूळ स्थान जपान, न्यू गिनी, दक्षिण ऑस्ट्रलिया या भागातील चिखलयुक्त सागरी तीरावर व खाडी प्रदेशातील आहे. या भागातील कांदळवनात हे मासे विपुल प्रमाणात आढळतात.

'उजनी'त प्रथमच सापडला परदेशी 'चंदा'! वाढतेय जैवविविधता
श्री विठ्ठल-रुक्‍मिणीमातेचे दागिने वितळवून बनवणार नवीन अलंकार!

वर्णन...

सामान्यपणे आयताकाराच्या हे माशांना बटबटीत डोळे असतात. या माशाचे तोंड गोलाकार असून जबड्यात छोट्या टोकदार दात दोन ओळीत रचलेले असतात. अंगावर काहीशा काटेरहित पर व हिरव्या-तांबूस व सिल्व्हर (रजत) रंगाच्या छटा असलेली कातडी असते. कातडीवर गडद तांबड्या- करड्या रंगाचे ठिपके असतात. शरीरावर पाच ते सहा उभे चकाकणारे पट्टे असतात. पोहण्यासाठी पाठीवर व अधर बाजूस काटेरी पर असतात. शेपटाकडील पर जपानी पंख्यासारखे आकर्षक असते. हे मासे पोहताना मोहक वाटतात. याच कारणामुळे हे मासे जगभरात पाळतात व मत्स्य घरासाठी त्या माशांना मागणी असते.

मच्छिमारांना मिळालेल्या या माशाला स्थानिक बाजारपेठेमध्ये व भिगवण मच्छी मार्केटपेक्षा जास्त दर मिळत नसल्याने मच्छिमार मार्केटला मासे नेणे टाळत आहेत. या मच्छिमारांनी हा आगळावेगळा मासा पुन्हा जलाशयात सोडून दिला. यापूर्वीही जलाशयाच्या पाण्यात इंडियन स्टार जातीचे कासव तर मध्यंतरी रेडलाईट जातीचे अमेरिकन कासव सापडले होते, तर यापूर्वी कधीही न सापडणारा सकर जातीचा अमेरिकन मासाही सापडला होता. तर केत्तूर येथे जलाशयात पाणमांजरही दिसले होते.

उजनी जलाशयाच्या गोड्या पाण्यामध्ये रहू, कटला, चांभारी, चिलापी, वांभट, शिंगटा, वडशिवडा आदी जातीचे मासे प्रमुख्याने सापडतात. परंतु जाळ्यांमध्ये हा आगळावेगळा मासा प्रथमच सापडल्याने उजनीची जैवविविधता वाढत असल्याचे दिसून येत आहे. उजनी जलाशयाच्या पाण्यात नवीन माशांची भर पडत असताना हे मासे मत्स्यशेती किंवा फिशटॅंकमधून आले असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

'उजनी'त प्रथमच सापडला परदेशी 'चंदा'! वाढतेय जैवविविधता
बागल गटाचे चिंतामणी जगताप यांचे बाजार समिती संचालक पद रद्द

आकर्षक रंगसंगती व लयबद्ध पोहणे या गुणधर्मामुळे हे मासे शोभेसाठी मत्स्यगृहात (फिश अक्वेरियम) पाळतात. खाण्यास उपयुक्त नसलेल्या या माशांना त्याच्या मूळ स्थानातील काही जमातीतील लोक खातात. या माशाला कोणीतरी मत्स्यप्रेमींनी उजनी जलाशयात सोडल्याचा अंदाज नाकारता येत नाही.

- डॉ. अरविंद कुंभार, प्राणिशास्त्र अभ्यासक

नेहमीच या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहणाऱ्या उजनी जलाशयाच्या जैवविविधतेत वरचेवर वाढच होत असताना या जैवविविधतेचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने आवश्‍यक ते प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

- कल्याणराव साळुंके, पक्षीप्रेमी, कुंभेज (ता. करमाळा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com