
सोलापूर : शेळगी हद्दीतील महेश थोबडे नगरातील व्यापारी शिवानंद लिंगप्पा कडबगावकर यांच्या घरातून १३ जून रोजी दुपारी २७ तोळे सोन्याचे दागिने व दोन किलो चांदीची चोरी झाली होती. या गुन्ह्यातील चारपैकी तिघांना जोडभावी पेठ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ३६.२२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.