या घटनेत विहिरीत पडताना सुरवातीला ट्रॅक्टरचे हेड पडले. ट्रॅक्टरच्या हेडवर बसलेली तीनही मुले विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडली.
कुर्डुवाडी : मुकादमाने हयगयीने चालविल्याने ट्रॅक्टर (Tractor Incident) विहिरीत पडून ऊसतोड कामगाराच्या (Sugarcane Laborer) तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिंगेवाडी (ता. माढा) येथे घडली.