मोहोळ तालुक्यात अंगावर विज पडुन तीन गायींचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Three cows die due to lightning incident in Mohol solapur

मोहोळ तालुक्यात अंगावर विज पडुन तीन गायींचा मृत्यु

मोहोळ : मोहोळ तालुक्यात रविवारी पहाटे झालेल्या पावसाने तसेच विजेच्या कडकडाटा मुळे येणकी ता मोहोळ येथील तीन गायींचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला ,तर इतर शेतकऱ्यांच्या आंबा व चिक्कू या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे द्राक्षघड उतरवण्याच्या स्थितीत आल्याने त्यांची पाचावर धारण बसली आहे. गेल्या आठवड्या पासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणात कमालीचा उकाडा वाढला होता. रविवारी पहाटे अचानक आकाशात ढगांनी गर्दी केली व विजेच्या कडकडाटा सह पावसाला सुरुवात झाली. त्या पावसातच जोरदार वीज कडकडल्याने

येणकी ता मोहोळ येथील धनाजी नागनाथ कदम यांच्या तीन गायीच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या पावसामुळे हवेत गारवा पसरला व नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान चालू वर्षी कडक ऊना मुळे आंब्याच्या झाडाचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाला आहे, त्यातून झाडावर राहिलेल्या कैऱ्या कमी प्रमाणात होत्या, मात्र रविवारच्या पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्याही गळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे चालू वर्षी ग्रामिण भागातील आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा पाऊस थोडा बहुत फायदेशीर असला तरी मोठ्या प्रमाणात नुकसानीचा असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे.

Web Title: Three Cows Die Due To Lightning Incident In Mohol Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top