घरातील गॅस गळतीमुळे तिघांचा मृत्यू! 2 चिमुकल्यांनंतर आज आजीचाही मृत्यू; कुटुंबकर्ता आउट ऑफ डेंजर, पण अर्धांगिणीची मृत्यूशी झुंज

लष्कर परिसरातील नळ बझार चौकातील गवंडी काम करणाऱ्या बलरामवाले कुटुंबातील तिघांचा घरातील गॅस गळतीमुळे मृत्यू झाला आहे. रविवारी सहा वर्षीय हर्षराज व चार वर्षाच्या अक्षराचा तर सोमवारी (ता. १) त्यांची आजी विमल मोहनसिंग बलरामवाले (वय ६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
solapur city
solapur city sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : लष्कर परिसरातील नळ बझार चौकातील गवंडी काम करणाऱ्या बलरामवाले कुटुंबातील तिघांचा घरातील गॅस गळतीमुळे मृत्यू झाला आहे. रविवारी (३१ ऑगस्ट) सहा वर्षीय हर्षराज व चार वर्षाच्या अक्षराचा तर सोमवारी (ता. १) त्यांची आजी विमल मोहनसिंग बलरामवाले (वय ६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

रात्री जेवण करून झोपताना गॅस सिलिंडरचा बर्नर सुरूच राहिला. त्यातून गॅस हळूहळू बाहेर येत होता, पण गाढ झोपेतील कुटुंबकर्ता युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय ४०), त्यांची पत्नी रंजनाबाई युवराज बलरामवाले (वय ३५), युवराज यांची आई विमल बलरामवाले (वय ६०) आणि हर्षराज व अक्षरा या चिमुकल्यांना काहीही कळले नाही. पाच फूट रुंद व दहा फूट लांब घराला एकही खिडकी नसल्याने आणि मुख्य दरवाजा पूर्णत: पॅकबंद असल्याने संपूर्ण सिलिंडरमधील गॅस पाच जणांच्या शरीरात गेला. त्यामुळे पाचही जण झोपेतच बेशुद्ध झाले.

त्यांना गल्लीतील लोकांनी रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जवळच्या शासकीय रुग्णालयात नेले; पण दोन्ही चिमुकल्यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्यांच्या आजीनेही जीव सोडला. चिमुकल्यांची आई रंजनाबाई या अद्याप बेशुद्ध आहेत. त्यांच्यावर ‘आयसीयू’त उपचार सुरू असून, त्यांची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. कुटुंबकर्ता युवराज यांची प्रकृती सुधारत असून, ते आउट ऑफ डेंजर असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

शरीरात ऑक्सिजनऐवजी हायड्रोकार्बनच

घरगुती गॅस सिलिंडरमध्ये सामान्यतः लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) असतो, ज्यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन यांसारख्या ज्वलनशील हायड्रोकार्बन वायूंचे मिश्रण असते. घरातील गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ११.३० पर्यंत त्या पाचही जणांच्या शरीरात ऑक्सिजनऐवजी हायड्रोकार्बनच गेला. त्यामुळे ते सगळेजण एकदा झोपले की पुन्हा उठलेच नाहीत. त्या सर्वांच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी झाल्याचेही डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com