Solapur News : टायर फुटून पिअकप पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pick up Overturned

कांदा घेऊन निघालेल्या पिकपचा अचानक मागील टायर फुटून ती पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

Solapur News : टायर फुटून पिअकप पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू

मोहोळ - कांदा घेऊन निघालेल्या पिकपचा अचानक मागील टायर फुटून ती पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार ता 16 रोजी मध्यरात्री दीड वाजता सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळेगाव फाट्याजवळ झाला. बिरमलसिंग धोंडी सिंग परदेशी (वय-50), दत्तात्रय भानुदास शेळके (वय-55) दोघे रा. कोरेगाव, ता. कर्जत जिल्हा अहमदनगर, तर नितीन धुळाजी बदंगे रा. बदंगेवाडी, ता. कर्जत अशी मृतांची नावे आहेत. यातील नितीन बदंगे हा पिकअप चा चालक आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, कोरेगाव येथून पिकअप क्र एम एच 16 ए वाय- 2674 ही वरील शेतकऱ्यांचा कांदा घेऊन सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सदरची पिकअप कोळेगाव फाट्या जवळ येतात अचानक तिचा पाठीमागचा टायर फुटला व ती रस्त्याच्या कडेला पलटी झाली. त्यात बिरमलसिंग परदेशी व दतात्रय शेळके हे शेतकरी बाहेर फेकले गेले. ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल केले असता ते उपचारापुर्वी मृत झाले. तर चालक नितीन बदंगे याला उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.

टॅग्स :accidentdeathmohol